News Flash

थिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’

‘रॉकी’ चित्रपटातील अभिनेता संदीप साळवेचा अनोखा प्रवास

आयुष्यात अनेक योगायोग होतात, अनेक अकल्पित गोष्टी घडत असतात. असाच एक योगायोग संदीप साळवे या युवकाच्या बाबतीत घडला आहे. थिएटरमध्ये चित्रपट बघायला येणाऱ्या प्रेक्षकाला अंधारात टॉर्चच्या उजेडात त्याच्या सीटपर्यंत पोहचवणारा गरीब घरातला संदीप आता मराठी रुपेरी पडद्यावर ‘हिरो’ म्हणून चमकणार आहे. ८ मार्चला प्रदर्शित होणाऱ्या अॅक्शनपॅक्ड ‘रॉकी’ या चित्रपटात तो आपल्याला रॉकीच्या मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे.

जगात दोन प्रकारची माणसं असतात. एक ते जी स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अखंड परिश्रम करतात आणि दुसरी ती जी स्वतःच्या स्वप्नांना बाजूला सारून आहे ती वाट चोखाळण्यात धन्यता मानतात. संदीपने यातील पहिली वाट चोखाळली. एकेकाळी अंधारात प्रेक्षकांना टॉर्च दाखवून सीटपर्यंत पोहचवणारा संदीप आज त्या अंधारातून बाहेर पडत चंदेरी दुनियेच्या झगमगाटात आपले पहिले पाऊल टाकतो आहे. ‘रॉकी’ या चित्रपटात एका डॅशिंग भूमिकेत तो प्रेक्षकांना दिसणार आहे. या भूमिकेसाठी फिटनेसपासून ते अगदी लुकपर्यंत संदीप याने खूप मेहनत घेतली आहे.

“बेताच्या असणाऱ्या परिस्थितीचा बाऊ न करता आईवडिलांनी मोठ्या कष्टाने मला वाढवलं आहे. मी देखील त्यांच्या मेहनतीची जाणीव ठेवत कष्ट करत राहिलो. २००३ मध्ये मी चेंबूरमधील अमर थिएटरमध्ये ‘टॉर्चमन’ म्हणून काम करायचो. या चित्रपटाचे दिग्दर्शक अदनान ए शेख याची व माझी ओळख होती. या चित्रपटासाठी त्यांनी मला विचारलं माझ्यासाठी हे सारं स्वप्नवत होतं पण आजवर प्रामाणिकपणे केलेल्या कामाचं फळ असून रुपेरी पडद्यावर आज स्वत:ला पाहताना त्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतंय”, असं संदीपने सांगितलं.

या सिनेमातून संदीप साळवे सोबत अक्षया हिंदळकर हा फ्रेश चेहरा तसेच अशोक शिंदे, प्रदीप वेलणकर, यतीन कार्येकर, क्रांती रेडकर, गणेश यादव, विनीत शर्मा, स्वप्नील राजशेखर, दीप्ती भागवत, हिंदीतील अभिनेते राहुल देव हे नावाजलेले कलाकारही दिसणार आहेत.

या चित्रपटाची निर्मिती ड्रीम व्हिवर प्रोडक्शन्स आणि सेव्हन सीज प्रोडक्शन्स यांनी केली असून प्रस्तुती पेपरडॉल एन्टरटेन्मेंट यांची आहे. प्रशांत त्रिपाठी, मनेश देसाई, नितीन शिलकर, हिमांशू अशर चित्रपटाचे निर्माते आहेत. सुनिता त्रिपाठी या कार्यकारी निर्मात्या आहेत. चित्रपटाची कथा-पटकथा दिग्दर्शन अदनान ए शेख यांचे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2019 5:04 pm

Web Title: sandeep salvi journey torchman to actor
Next Stories
1 ह.म.बने, तु.म.बने मध्ये मिळणार मुलांच्या सुरक्षिततेचे धडे
2 Trailer : इस ‘नोटबुक’ में हम हमेशा साथ रहेंगे!
3 Photo : पूजा बेदी लवकरच बांधणार या व्यावसायिकाशी लग्नगाठ
Just Now!
X