01 March 2021

News Flash

‘कॉमेडी बिमेडी’च्या मंचावर ‘सांग तू आहेस का’ मालिकेच्या टीमची धमाल

सिद्धार्थ चांदेकर, शिवानी रांगोळे आणि सानिया चौधरीची खास उपस्थिती

स्टार प्रवाहवरील ‘कॉमेडी बिमेडी’ आणि ‘सांग तू आहेस का’ या दोन्ही कार्यक्रमांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. या दोन्ही कार्यक्रमांमधील कलाकार नुकतेच एका मंचावर आले. निमित्त होतं ‘कॉमेडी बिमेडी’ कार्यक्रमाच्या विशेष भागाचं. या खास भागात सिद्धार्थ चांदेकर, शिवानी रांगोळे आणि सानिया चौधरी यांनी खास हजेरी लावत विनोदाच्या मेजवानीचा आनंद लुटला.

आशिष पवार आणि आरती सोळंकी यांनी यानिमित्ताने खास स्किट सादर करत हास्याची तुफान फटकेबाजी केली. या धमाल विनोदी स्किटचं सादरीकरण पाहून सिद्धार्थ चांदेकर आणि संपूर्ण टीमला हसू आवरलं नाही आणि त्यांनी कॉमेडी बिमेडीच्या टीमचं भरभरुन कौतुक केलं.

आणखी वाचा : ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील हा अभिनेता करतोय बॉलिवूडमध्ये पदार्पण

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात निखळ हास्याचे क्षण कुठेतरी हरवत चालले आहेत. कॉमेडी बिमेडी कार्यक्रमाद्वारे हेच हरवलेले मजेशीर क्षण पुन्हा वेचण्याचा प्रयत्न आहे. विनोदाचं अफलातून टायमिंग आणि भन्नाट विनोदी किस्से ‘कॉमेडी बिमेडी’ या कार्यक्रमात प्रेक्षकांना अनुभवायला मिळतं. हा विशेष भाग शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता प्रसारित होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2020 6:39 pm

Web Title: sang tu aahes ka serial team arrived on comedy bimedy set ssv 92
Next Stories
1 “लो बजेट हॅरी पॉटर”; अनुपम खेर यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून व्हाल थक्क
2 ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील हा अभिनेता करतोय बॉलिवूडमध्ये पदार्पण
3 प्रियांकाने शेअर केला निकसोबतचा सोफ्यावरील रोमॅण्टिक फोटो आणि…
Just Now!
X