दाक्षिणात्य सुपरस्टार यशचा K.G.F Chapter 2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात अभिनेता संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. अलिकडेच K.G.F Chapter 2 चं नवं पोस्टर देखील प्रदर्शित झालं होतं. या पोस्टरमधून संजय दत्तचा खलनायक लूक समोर आला होता. परंतु कर्करोगग्रस्त संजयमुळे हा चित्रपट लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. चाहत्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे स्वत: संजय दत्तनेच ही चर्चा फेटाळून लावली आहे. एन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करुन K.G.F ची तयारी सुरु केल्याचे संकेत त्याने दिले आहेत.
अवश्य पाहा – एकाच वेळी ‘ती’ दोघांना करत होती डेट; ‘बिग बॉस’मध्ये झाला डबल डेटिंगचा भांडाफोड
अवश्य पाहा – माधुरीला वाचवण्यासाठी आमिताभ-गोविंदा यांनी गुंडांसोबत केली होती फाईट; पाहा व्हिडीओ…
संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाला आहे. त्याला चौथ्या टप्प्यातील कर्करोग झाल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे. तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. मात्र या उपचारांमुळे KGF चं चित्रीकरण लांबणीवर जाणार नाही असं वचन त्याने आपल्या चाहत्यांना दिलं आहे. यापूर्वी असचं काहीसं वचन चित्रपटाचे निर्माते कार्तिक गौंडा यांनी देखील दिलं होतं. “चित्रपटाचं शूटिंग जवळपास पूर्ण झालं आहे. संजय दत्तचे केवळ तीन सीन बाकी आहे. शिवाय आम्ही तीन महिन्यानंतर चित्रीकरण सुरु करणार आहोत. तो पर्यंत संजय पूर्णपणे बरा होईल अशी आम्हाला खात्री आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी काळजी करु नये. K.G.F Chapter 2 ठरलेल्या दिवशीच प्रदर्शित होईल.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात तो अधीरा हे पात्र साकारणार आहे. काही महिन्यांपूर्वी संजय दत्तने या आगामी चित्रपटाचा पोस्टर शेअर करुन याबाबत माहिती दिली होती. दुसरा भागाचा आवाका पहिल्या भागापेक्षाही अधिक मोठा असेल असे अभिनेता यशने सांगितले होते. हा चित्रपटही पहिल्या भागाप्रमाणेच हिंदी, तामिळ आणि कन्नड या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.