News Flash

‘आज त्याचे लग्न झाले असून…’, संजय दत्तच्या मुलीने एक्स बॉयफ्रेंड विषयी केला खुलासा

जाणून घ्या सविस्तर..

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची लेक त्रिशाला दत्त ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकताच तिने इन्स्टाग्रामवरील फिचर ‘Ask me’द्वारे चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. दरम्यान एका चाहत्याने तिला तिच्या रिलेशनशिपबद्दल प्रश्न विचारला.

त्रिशालाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीद्वारे चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर दिले आहे. चाहत्याने तिच्या सर्वात जास्त वेळ टिकलेल्या रिलेशनशिपबद्दल प्रश्न विचारला. “मला जाणून घ्यायला आवडेल की तुझे आतापर्यंतचे सर्वात जास्त काळ टिकलेले नाते कोणते? आणि तुमचं ब्रेकअप का झालं?” असा प्रश्न विचारला होता.

चाहत्याच्या या प्रश्नावर त्रिशालाने उत्तर देत, ” ७ वर्षे. ते का संपले याबद्दल मी खोलवर सांगणार नाही, परंतु आम्ही दोघांनी यावर विचार करून वेगळे होण्याचा निर्णय एकत्र घेतला. त्याला आता पुढे जायचे होते आणि मी त्यासाठी तयार नव्हते आणि बऱ्याच वर्षांपासून आमच्यात मतभेद होतं होते. थोडक्यात – आम्ही दोघेही वेगळे झालो. असे घडते. आज त्याचे लग्न झाले असून त्याला मुलं देखील आहेत आणि मी त्याला शुभेच्छा देते,” असे त्रिशला म्हणाली.

त्रिशाला ही संजय दत्त आणि रिचा शर्माची मुलगी आहे. तिचा जन्म १९८८ साली झाला. त्रिशालाचे संपूर्ण शिक्षण हे न्यूयॉर्कमध्ये झाले आहे. त्रिशाला ही मानसशास्त्रज्ञ आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2021 2:04 pm

Web Title: sanjay dutt s daughter trishala dutt reveals about her longest relationship and how it ends dcp 98
Next Stories
1 अमेरिकेच्या राष्ट्रपतींना ‘देसी गर्ल’ प्रियांका म्हणाली….
2 ‘लोकं उपाशी मरतायेत आणि…’, काजोलचा व्हिडीओ पाहून संतापले यूजर्स
3 “नेत्यांच्या मागे एवढी गर्दी असते, त्यांना लॉकडाउनचा नियम नाही का?”, केदार शिंदेचा सवाल
Just Now!
X