18 January 2021

News Flash

कधीकाळी ‘हा’ स्टारकिड होता तैमूरपेक्षाही अधिक लोकप्रिय!

त्याची एक झलक दिसावी यासाठी त्याचे चाहते जीवाचं रान करत असल्याचं समोर आलं आहे.

‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटातून पुन्हा एकदा कलाविश्वात पदार्पण करणारी अभिनेत्री करिना कपूर-खानचा लाडका लेक तैमूर जन्माला आल्यापासून स्टारडम उपभोगत आहे. आपल्या आई-वडीलांप्रमाणेच आता त्यालाही कॅमेराची आणि प्रसारमाध्यमांची सवय झाली असून तो हसतहसत त्यांना सामोरा जातो. त्यामुळे सध्या तो स्टारकिडच्या यादीत अग्रस्थानावर आहे. मात्र तैमूरने जी लोकप्रियता मिळविली आहे त्याच्यापेक्षा कैकपटीने पूर्वी अन्य एका स्टारकिडने लोकप्रियतेचं शिखरं सर केलं होतं.

संजय दत्त यांच्या जीवनावर आधारित ‘संजू’ हा चित्रपट २९ जून रोजी प्रदर्शित होत असून संजयच्या जीवनातील एक एक घटना उलगडल्या जात आहेत. त्यातच या लोकप्रिय स्टारकिडच्या नावाचा खुलासा झाला आहे. नर्गिस आणि सुनील दत्त यांचा मुलगा संजय दत्त लहान असताना प्रचंड लोकप्रिय होता. त्याची एक झलक दिसावी यासाठी त्याचे चाहते जीवाचं रान करत असल्याचं समोर आलं आहे.

१९६०पर्यंतचा काळ गाजविणारी अभिनेत्री नर्गिस आणि अभिनेता सुनील दत्त ही जोडी त्याकाळी प्रचंड लोकप्रिय होती. त्यामुळे त्यांच्या मुलांनाही लोकप्रियता उपभोगता आली.मात्र या लोकप्रियतेमध्ये संजय दत्तने विशेष नाव मिळविले. त्याकाळी स्टारकिडमध्ये संजयच्या नावाची जोरदार चर्चा होती. इतकंच नाही तर संजूबाबाची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते जीवाचं रान करताना पाहायला मिळत असतं.

संजयच्या या बालपणीच्या आठवणी यासीर उस्मान यांनी एक पुस्तक लिहीली असून त्यामध्ये संजयच्या जीवनातील काही घटना नमूद करण्यात आल्या आहेत. त्यातच संजयच्या बालपणींच्या आठवणींना उजाळाही देण्यात आला आहे.

स्टारकिडमध्ये अग्रस्थानावर असलेल्या संजूबाबाचे फोटो अनेक फिल्मी मासिकांच्या मुखपृष्ठावर छापण्यात आले होते. संजूच्या बालपणीतील एक रंजक किस्सा म्हणजे त्याच्या बारशाच्या वेळी संजयचं नाव निश्चित करता यावं यासाठी एका मासिकाने त्यांच्या वाचकांना संजूबाबासाठी नाव सुचविण्याची विनंती केली होती. यानुसार काही वाचकांनी संजयच्या नामकरणासाठी काही नावंही नर्गिस आणि सुनील दत्त यांना सुचविली होती आणि अखेर नर्गिस-सुनील यांच्या लाडक्या लेकाचं नाव संजय असं ठेवण्यात आलं.

दरम्यान, त्याकाळी सोशल मिडीयाचा जास्त वापर होत नसल्यामुळे संजय सतत प्रसारमाध्यमांसमोर येऊ शकला नाही. मात्र त्याच्या चाहत्यांमध्ये त्याची प्रचंड क्रेझ होती हे काही किस्स्यांमुळे दिसून आल्याचं सांगण्यात येत आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2018 4:47 pm

Web Title: sanjay dutt was as popular starkid in childhood as taimur
Next Stories
1 अमेरिकेच्या ‘फर्स्ट लेडी’ला मीरा राजपूत काय म्हणाली ऐकलंत का?
2 बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
3 IIFA 2018 : आयफा पुरस्कार सोहळ्यासाठी रेखा बँकॉकमध्ये दाखल
Just Now!
X