News Flash

दीपिका नाही तर हा असेल भन्साळींच्या आगामी चित्रपटातला नवा चेहरा

तिला तीन चित्रपटासाठी करारबद्ध करण्यात आलं आहे.

दीपिका नाही तर हा असेल भन्साळींच्या आगामी चित्रपटातला नवा चेहरा

संजय लीला भन्साळी आणि दीपिका पादुकोन हे बॉलिवूडमधलं सुपरहिट समीकरण आहे. भन्साळींच्या आतापर्यंतच्या तीन चित्रपटात दीपिका मुख्य अभिनेत्री म्हणून झळकली. रामलीला, बाजीराव मस्तानी, पद्मावत हे तिन्ही चित्रपट दोघांच्या कारकिर्दीतले सुपरहिट चित्रपट ठरले त्यामुळे भन्साळींच्या चित्रपटात दीपिकाच मुख्य अभिनेत्री असेल हे जणू ठरलेलंच आहे. मात्र आता संजय लीला भन्साळी यांनी नव्या चेहऱ्याला संधी देण्याचं ठरवलं आहे. संजय लीला भन्साळी त्यांची भाची शर्मिन सहगलला लाँच करत आहे.

भन्साळी फिल्मनं याची नुकतीच घोषणा केली असून शर्मिन लवकरच भन्साळींच्या तीन मोठ्या चित्रपटात दिसणार आहे. शर्मिनला तीन चित्रपटासाठी करारबद्ध करण्यात आल्याची अधिकृत माहिती भन्साळी प्रोडक्शननं दिली आहे. कोणत्या चित्रपटात शर्मिन दिसणार हे मात्र कळू शकलं नाही. सध्या संजय लिला भन्साळी सलमान खान सोबत काम करत आहेत. सलमान सोबत ते लव्हस्टोरी घेऊन येत आहेत. या चित्रपटासाठी मुख्य अभिनेत्रीचा शोध सुरू आहे त्यासाठी प्रियांका चोप्रासोबतच शर्मिनचं नावही चर्चेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2019 5:45 pm

Web Title: sanjay leela bhansali is all set to launch sharmin segal
Next Stories
1 ऑस्कर विजेता अभिनेता करणार बॉण्डपटात विलनचा रोल
2 नवाजलाही वाटतंय बॉलिवूडमध्ये ‘खान’चा जमाना न संपणारा
3 Pulwama Attack : शहिद जवानाच्या कुटुंबीयांना मानले अक्षय कुमारचे आभार
Just Now!
X