News Flash

“बिग बी नाही तर साराकडून ‘ही’ गोष्ट शिकले”; दीपिकाचं सलमानला मजेशीर उत्तर

हे उत्तर ऐकून सलमानसह उपस्थित प्रेक्षकसुद्धा हसले.

सलमान खान, दीपिका पदुकोण

‘छपाक’ या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी अभिनेत्री दीपिका पदुकोण ‘बिग बॉस’च्या घरात पोहोचली. यावेळी सहकलाकार विक्रांत मेस्सी आणि अॅसिड हल्ल्यातून बचावलेली लक्ष्मी अगरवाल तिच्यासोबत होते. लक्ष्मीच्या जीवनावर ‘छपाक’ हा चित्रपट आधारित आहे. बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांसोबत तिघांनीही गप्पा मारल्या, काही टास्कसुद्धा खेळले. बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी दीपिकाची भेट सलमानशी झाली. या भेटीदरम्यान सलमानच्या निदर्शनास दीपिकाची एक गोष्ट आली, ती म्हणजे तिची नमस्ते करण्याची पद्धत. ही पद्धत बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांच्याकडून शिकलीस का असा प्रश्न सलमानने विचारला असता दीपिकाने त्यावर मजेशीर उत्तर दिलं.

“तू बिग बींसारखं कधीपासून वागू लागलीस”, असं म्हणत सलमानने दीपिकाची मस्करी केली. त्यावर दीपिका म्हणाली, “सारा अली खानकडून शिकतेय. तीसुद्धा अशाच पद्धतीने नमस्कार करते. लव्ह यू सारा..” हे उत्तर ऐकून सलमानसह उपस्थित प्रेक्षकसुद्धा हसले.

आणखी वाचा : बॉक्स ऑफिसवरही ‘तान्हाजी’च हीरो

दीपिकाने बिग बॉसच्या घरात स्पर्धकांना एक नवीन टास्क दिलं. या टास्कमध्ये तिला ‘टीम बी’ची कामगिरी फार आवडली. या टीममध्ये विशाल, मधुरिमा, शहनाज, आरती आणि शेफाली होत्या. या एपिसोडमध्ये ‘बिग बॉस’च्या इतिहासात पहिल्यांदाच काही स्पर्धकांना काही क्षणांसाठी घराबाहेर जाण्याची संधी देण्यात आली. या स्पर्धकांना दीपिकाने काही वेळासाठी ‘बिग बॉस’च्या घराबाहेर नेले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2020 6:28 pm

Web Title: sara ali khan not amitabh bachchan says deepika padukone response to salman khan question ssv 92
Next Stories
1 विश्वास पाटलांची ‘चंद्रमुखी’ आता मोठ्या पडद्यावर; प्रसाद ओक करणार दिग्दर्शन
2 तान्हाजी मालुसरे आणि माझ्यात कुठलेही साम्य नाही- अजय देवगण
3 ‘तान्हाजी’साठी अजय, काजोल व सैफला मिळाले तब्बल इतक्या कोटींचे मानधन
Just Now!
X