04 March 2021

News Flash

PHOTO : जब काजोल मेट युवराज सिंग

एअरपोर्टवर झाली दोघांची भेट

अभिनेत्री काजोल, क्रिकेटर युवराज सिंग

सोशल मीडियाचा वापर गेल्या काही दिवसांमध्ये वाढल्याचं लक्षात आलं आहे. किंबहुना बरेच सेलिब्रिटीसुद्धा या माध्यमाचा वापर करत चाहत्यांसोबत एक प्रकारचं नातं जोडू पाहात आहेत. बॉलिवूड चित्रपटांमधून दिलखुलास आणि बेधडक भूमिका साकारणारी अभिनेत्री काजोलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक सेल्फी पोस्ट केला आहे. क्रिकेटर युवराज सिंगसोबतचा हा तिचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

आता काजोलने युवराज सिंगची भेट का घेतली असावी असा प्रश्न तुम्हाला पडला ना? तर बुधवारी पडलेल्या मुसधळार पावसाचा फटका विमान वाहतुकीलाही बसला होता. त्यामुळे काही विमानं रद्द करण्यात आली तर काही उशिराने होती. विमान वाहतूक उशिरा असल्याने काजोलदेखील एअरपोर्टवर वाट पाहात बसलेली. त्यावेळी तिची भेट युवराज सिंगशी झाली. ‘विमानासाठी वाट पाहत बसणं यापूर्वी कधीच एवढं आनंददायी नव्हतं,’ असं कॅप्शन देत तिने सेल्फी पोस्ट केला.

काजोलसोबतचा हाच सेल्फी युवराजनेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला. आपल्या आवडत्या अभिनेत्रीला भेटण्याचा आनंद त्याने व्यक्त केला. युवराजने पोस्ट केलेल्या या फोटोला केवळ पाच तासांमध्ये १ लाख ६० हजारहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तर काजोलने पोस्ट केल्यानंतर तासाभरातच ४० हजारपेक्षा अधिक लाइक्स मिळाले.

गेल्या काही दिवसांपासून काजोल सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय आहे. खरंतर काजोल सोशल मीडियापासून चार हात लांब राहणंच पसंत करते. बऱ्याचदा तर मला ही एक प्रकारची जबाबदारी आणि ओझं वाटतं, असं तिने एका मुलाखतीत म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2017 4:07 pm

Web Title: selfie time of kajol with yuvraj singh
Next Stories
1 ‘तारक मेहता..’च्या सेटवर दयाबेनचा शेवटचा दिवस
2 वरुण धवन तेलगूमध्ये बोलतो तेव्हा…
3 Kaun Banega Crorepati : पतीच्या स्वप्नासाठी जगणारी उपजिल्हाधिकारी
Just Now!
X