News Flash

‘पान मसाल्या’च्या जाहिरातीमुळे किंग खान ट्रोल, नेटकरी म्हणाले..

पाहा काय म्हणाले नेटकरी

‘पान मसाल्या’च्या जाहिरातीमुळे किंग खान ट्रोल, नेटकरी म्हणाले..
(Photo credit - vimal elaichi youtube)

बॉलिवूड अभिनेता अजय देवगन गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. आधी तो ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटातील त्याच्या मुख्य भूमिकेमुळे चर्चेत होता. तर आता विमल पान मसालाच्या जाहिरातीमुळे चर्चेत आहे. ‘बोलो झुबान केसरी’ या वाक्यावर तर मीम्स अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जाहिरातीत बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान सुद्धा दिसत आहे. त्यामुळे अजय आणि शाहरूख दोघेही सोशल मीडियावर ट्रोलिंगचा शिकार झाला आहे.

विमलच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जाहिरातीत, अजय देवगन एका अनोळखी व्यक्तीचा पाठलाग करताना दिसतो. परदेशात विमलमुळे त्यांची भेट होते. ही जाहिरात प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच नेटकऱ्यांनी शाहरूखला ट्विटरवर ट्रोल केलं आहे.

एक नेटकरी म्हणाला, “विमलची जाहिरात केल्यानंतर शाहरूख त्याच्या प्रत्येक वाढदिवसाला घराच्या बाहेर विमल वाटेल.” तर दुसरा म्हणाला, “शाहरूख खान विमलची जाहिरात करतोय? हे तेव्हाच होतं जेव्हा आपण तिन वर्ष काही काम करत नाही.” एक म्हणाला, “अक्षय कुमार आणि शाहरूखमध्ये हाच फरक आहे. अक्षय कुमार प्रोटीनची जाहिरात करतो तर शाहरूख विमलची एक सुपरस्टार लोकांच्या चांगल्या आरोग्याचा विचार करतो तर एक त्यांचे आरोग्य खराब करतो.”

शाहरूख तिन वर्षांनंतर आता ‘पठान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा एण्ट्री करणार आहे. या चित्रपटात शाहरूखसोबत दीपिका पदूकोण आणि जॉन अब्राहम हे दोघे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2021 10:59 am

Web Title: shah rukh khan s addition to ajay devgn s vimal ad invites a meme fest dcp 98
टॅग : Shahrukh Khan
Next Stories
1 “वडिलांच्या निधनानंतर देवावर खूप राग आला होता”, ऑपरा विन्फ्रेच्या मुलाखतीत प्रियांकाचा खुलासा
2 ड्राइव्ह इन ‘फॅशन वीक’
3 संदर्भ तेच, दृष्टिकोन वेगळा
Just Now!
X