29 September 2020

News Flash

अक्षय कुमारसोबत काम करणं अशक्य – शाहरुख खान

शाहरुख- अक्षय एकत्र झळकावेत अशी चाहत्यांची इच्छा आहे.

शाहरुख खान

बॉलिवूडमधील शाहरुख खान आणि अक्षय कुमार ही नावाजलेली नावं आहेत. आजवर या दोघांनी अभिनयाच्या जोरावर स्वत:च स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. या दोघांचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले असून त्यांनी बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई केली आहे. मात्र या दोघांना फार कमी वेळा एकत्र पाहायला मिळालं आहे. त्यामुळे या दोघांनी एकत्र स्क्रीन शेअर करावी अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. मात्र शाहरुखने अक्षयसोबत स्क्रीन शेअर करण्यास नकार दिला आहे.

‘अक्षय आणि मी एकत्र काम करणं तसं फार अशक्य आहे. कारण त्याच्या आणि माझ्या वेळा जमून येणं शक्य नाही. अक्षय प्रचंड वक्तशीर व्यक्ती असून मी त्याच्या विरुद्ध आहे. त्यामुळे आम्ही एका चित्रपटात काम करणं आमच्यासाठी प्रचंड अवघड आहे’, असं शाहरुखने सांगितलं.

पुढे तो असंही म्हणाला, ‘अक्षयच्या दिवसाची सुरुवात फार लवकर होते. त्यामुळे तो कामालाही लवकर लागतो. मात्र माझं तसं नाही. जेव्हा मी माझ्या चित्रपटाचं चित्रीकरण संपवतो तोपर्यंत मला खूप उशीर झाला असतो. मी काम करताना कधी वेळ पाहत नाही. त्यामुळे आमच्या कामाच्या वेळा जुळून येणं फार कठीण आहे’.

दरम्यान, ‘अक्षयसोबत काम करण्याची संधी मिळाली तर चांगलंच आहे. मला त्याच्यासोबत काम करायला नक्कीच आवडेल. मात्र आम्ही एकाच चित्रपटात काम केलं तरीदेखील आमची भेट होणं अशक्य असल्याचं दिसून येतं’, असंही त्याने सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 3:28 pm

Web Title: shahrukh khan wants to to work with akshay kumar but timing not match
Next Stories
1 Photos : वरुण-श्रद्धा झाले ‘स्ट्रीट डान्सर’
2 गरज सरल्यावर बडे कलाकार मला विसरतात – कंगना रणौत
3 सोनू सूदवर भडकली कंगना रणौत
Just Now!
X