24 September 2020

News Flash

सुशांतच्या आठवणीत बहिण श्वेताने तयार केलं गाणं; व्हिडीओ होतोय व्हायरल

सुशांत मृत्यू प्रकरण: रिया चक्रवर्ती आणि शोविकच्या अडचणींमध्ये वाढ

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आता दोन महिने उलटून गेले आहेत. सीबीआय आणि एनसीबीमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे या प्रकरणातील खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा मिळेपर्यंत चाहत्यांनी सुशांतच्या कुटुंबीयांमागे भक्कमपणे उभं राहावं अशी विनंती सुशांतची बहिणी श्वेता सिंह किर्ती हिने केली आहे.

अवश्य पाहा – कंगनाने केलं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ट्विट, म्हणाली…

अवश्य पाहा – “या देशात अल्पसंख्यांक असणं गुन्हा आहे”; उमर खलिदच्या अटकेवर अभिनेत्याने व्यक्त केला संताप

सुशांतच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी किर्तीने एक गाणं तयार केलं आहे. या गाण्याची एक लहानशी झलक तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. “सुशांत कायम आपल्या सर्वांच्या हृदयात राहील. त्याची स्वप्नं आपण पूर्ण करुया.” अशा आशयाचं ट्विट किर्तीने केलं आहे. सुशांत मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर किर्तीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. या गाण्याच्या माध्यमातून सुशांतच्या कुटुंबीयांनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

रिया, शोविकचा जामीन अर्ज फेटाळला

अभिनेता सुशांत सिंह राजपूतला मृत्युपूर्वी अंमली पदार्थ उपलब्ध केल्याच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक या दोघांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. विशेष न्यायालयाने रिया आणि शोविकसह अब्दुल बसित, झैद विलात्रा, दीपेश सावंत आणि सॅम्युअल मिरांडा यांचाही जामीन अर्ज फेटाळला आहे.
२८ ऑगस्टला तपासासाठी मुंबईत आलेल्या एनसीबीच्या विशेष पथकाने १० दिवसांत शोविक, मिरांडा, दीपेशसह आठ आरोपींना अटक करून अंमली पदार्थ, रोकड आणि परकीय चलन जप्त केले. त्यानंतर एनसीबीकडून रियाच्या अटकेची मोठी कारवाई करण्यात आली. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक यांनी अनेकदा विविध व्यक्तींच्या माध्यमातून चरस, गांजा हे अंमली पदार्थ मागवल्याची आणि विकत घेतल्याची कबुली अटक आरोपी दीपेश सावंत याने दिल्याचे एनसीबीने न्यायालयाला सांगितले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 2:02 pm

Web Title: shweta singh kirti new song sushant singh rajput mppg 94
Next Stories
1 ‘सिंगिंग स्टार’च्या मंचावर अजय – बेला येणार तब्बल दहा वर्षांनी एकत्र
2 ‘डॉक्टर डॉन’मध्ये ऐन पावसाळ्यात साजरा होणार अनोखा ‘व्हॅलेंटाईन्स डे’
3 ‘खाली पीली’मधील नवे गाणे प्रदर्शित होताच डिसलाईकचा भडीमार
Just Now!
X