News Flash

श्वेता तिवारीने शेअर केला मुलगी पलक तिवारीचा BTS व्हिडीओ, सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल

श्वेता तिवारी आणि अभिनव कोहली यांच्यातील वाद सुरू असतानाच मुलगी पलकने सोशल मीडिया अकाऊंट बंद केलं होतं. पण आता तिने ग्लॅमरस अंदाजात पुन्हा एन्ट्री केलीय.

(Photo: Instagram/shweta.tiwari and palaktiwarii)

‘खतरों के खिलाडी 11’ ची स्पर्धक श्वेता तिवारी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या फोटोज आणि व्हिडीओमुळे चर्चेत आलीय. श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सध्या डेब्यू करण्याच्या तयारीत आहे. आईप्रमाणे मुलगी पलक सुद्धा आपल्या हॉट फोटोशूट्सवरून ती सतत लोकांच्या मनावर राज्य करतेय. लोक तिच्या सौंदर्याची तुलना तिच्या आईशी करत असतात. श्वेता तिवारीने पुन्हा तिच्या मुलीचा एक फोटो शेअर करून तिच्याबद्दल प्रेम व्यक्त केलं.

अभिनेत्री श्वेता तिवारीने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला मुलगी पलकचा एक BTS व्हिडीओ शेअर केलाय. पलकचा हा व्हिडीओ एका फोटोशूट दरम्यानचा आहे. या व्हिडीओमध्ये पलक खूपच सुंदर आणि स्टायलिश दिसून आली. श्वेता तिवारीच्या मुलीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा BTS व्हिडीओ शेअर करताना श्वेता तिवारीने एक कॅप्शन देखील लिहिलंय. “डिवा तयार होत नाहीत, तर त्या जन्म घेतात”, असं तिने या कॅप्शनमध्ये मुलीचं कौतुक केलंय.

Shweta-Tiwari-shares-BTS-video-of-daughter-Palak's-glamourous (Photo: Instagram@shweta.tiwari)

टिव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी आणि तिचा पती अभिनव कोहली यांच्यामध्ये सुरु असलेला वाद चांगलाच चर्चेमध्ये आला. याच दरम्यान, श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीने आपले सोशल मीडिया अकाऊंट बंद केले होते. पण आता पुन्हा ती सोशल मीडियावर सक्रीय झाली आहे. नुकतंच तिने स्वतःचे ग्लॅमरस फोटोज शेअर करून सोशल मीडियावर दमदार एन्ट्री केलीय. एका बड्या अभिनेत्रीला सुद्धा टक्कर देईल असे हॉट आणि ग्लॅमरस फोटोज पलक शेअर करत असते. लवकरच ती बॉलिवूडमध्ये सुद्धा पदार्पण करणार आहे. तिचा हा ग्लॅमरस अंदाज सर्वांना खूप आवडत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii)

श्वेता तिवारी गेल्या काही दिवसांपासून केपटाउनमध्ये ‘खतरों के खिलाडी ११’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. परंतू आता ती शूटिंग संपवून पुन्हा भारतात परतलीय. आपल्या मुलांना भेटण्यासाठी ती खूप आतूर आहे. सध्या ती मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन आहे.

दरम्यान, पलक तिवारी ‘रोजी- द सॅफ्रॉन चॅप्टर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. तिचा हा पहिला चित्रपट याच महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल मिश्रा यांनी केलं आहे. तर विवेक ओबेरॉय आणि प्रेरणा व्ही अरोरा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. पलक तिवारीसोबत या चित्रपटात विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2021 7:34 pm

Web Title: shweta tiwari shared bts video of daughter palak tiwari prp 93
Next Stories
1 LGBT Pride Month Special: समलैंगिक संबंधांवर प्रकाश टाकणारे हे मराठी सिनेमा आणि शो पाहिले का?
2 एका ट्रकला पाहून जावेद अख्तर यांनी लिहिलं ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हे गाणं…
3 ‘चोली के पिछे क्या है’ गाण्याचा ‘तो’ व्हिडीओ पाहून माधुरी दीक्षित आणि सुभाष घई भावूक
Just Now!
X