येत्या प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर आणखी एका देशभक्तीपर चित्रपटाची वर्णी लागणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि मनोज वाजपेयी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘अय्यारी’ चित्रपटाचा पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. पोस्टरची पहिली झलक पाहता ‘अय्यारी’ चित्रपटसुद्धा नीरज पांडेच्या ‘बेबी’ किंवा ‘अ वेनस डे’ या चित्रपटांच्या पठडीतलाच असेल याचा अंदाज लावता येतो.
देह व्यापाराच्या आरोपाखाली दोन अभिनेत्रींना अटक
‘अय्यारी’च्या पहिल्या पोस्टरमध्ये सिद्धर्थ आणि मनोज यांच्याव्यतिरिक्त अनुपम खेर, नसिरुद्दीन शहा, पूजा चोप्रा आणि आदिल हुसैन यांसारखे महत्त्वाचे चेहरेही दिसतात. तसेच, तिरंग्यासह पोस्टरवर लंडनचा ब्रिजही दिसतो.
#AiyaaryPoster is out now! Be a part of our journey this #RepublicDay. #VijayDiwas@Aiyaary @S1dharthM @BajpayeeManoj @Rakulpreet @Pooja_Chopra_ #NaseeruddinShah @AnupamPkher @FFW_Official @RelianceEnt @PlanC_Studios @PenMovies @ShitalBhatiaFFW pic.twitter.com/E2XPFQspAQ
— Neeraj Pandey (@neerajpofficial) December 16, 2017
‘अय्यारी’चे चित्रीकरण दिल्ली, लंडन आणि काश्मीरमध्ये करण्यात आले आहे. विरुद्ध विचारसरणी असणाऱ्या आणि जिद्दी स्वभाव असलेल्या दोन आर्मी ऑफिसवर चित्रपटाची कथा आधारित आहे. एका गुरु आणि शिष्याच्या नात्यावर आधारित सत्य कथा ‘अय्यारी’मध्ये पाहावयास मिळाले.
दीपिकाच्या वडिलांसोबत रणवीरचा ‘परफेक्ट सेल्फी’
२६ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या सिद्धार्थ, मनोजच्या ‘अय्यारी’ला अक्षय कुमारचा ‘पॅडमॅन’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर टक्कर देईल.