News Flash

अल्का याज्ञिकसोबत हिमेश रेशमियाचा जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल; फॅन्स म्हणाले, “हे तर फारूख शेख आहेत..”

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोपेक्षा फोटोवर येणाऱ्या कमेंट्स पाहणं मजेदार ठरतंय.

बॉलिवूडचा गायक हिमेश रेशमियाचा एक जुना फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा फोटो पाहून सगळेच जण आश्चर्यचकीत झाले आहेत. या फोटोमध्ये हिमेशला पाहून काही जण फारूख शेख म्हणत आहेत, तर काही जणांनी चक्क ‘तारक मेहता का उल्ट चष्मा’मधला भिडे असल्याचं सांगत आहेत. एकुणच काय तर हिमेश रेशमियाच्या या ट्रान्सफॉर्मेशनला पाहून सगळेच आश्चर्य झालेत.

बॉलिवूड गायक हिमेश रेशमियाचं नवं गाणं ‘सुरुर 2021’ सध्या धुमाकुळ घालतंय. या गाण्याला आतापर्यंत 33 मिलियन पेक्षा जास्त लोकांनी पाहिलंय. या गाण्यासोबतच हिमेशचा हा जुना फोटो सुद्धा सोशल मीडियावर धुमाकुळ घालतोय. या फोटोमध्ये हिमेश सोबत अल्का याज्ञिक सुद्धा दिसून येत आहेत. या फोटोमध्ये चेक्सचं शर्ट आणि ट्राउजर घातलेल्या या हिमेशला पाहून त्याच्यामध्ये पहिल्यापेक्षा आता जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन झाल्याचं दिसून येतंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rarephotoclub (@rarephotoclub)

हिमेश पहिल्यापेक्षा आता जास्त हॅंडसम दिसू लागला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोवर युजर्सचे जबरदस्त कमेंट्स दिसून येत आहेत. “आम्हाला माहितेय हे फारूख शेख सर आहेत”, असं एका युजरने लिहिलंय. तर “दिवसेंदिवस हिमेशचं वय कमी होत चाललंय”,”हा तर तारक मेहता का उल्टा चष्मामधला भिडे आहे” अशा वेगवेगळ्या कमेंट्स या फोटोवर दिसून येत आहेत. काही युजर्सनी तर हिमेशचं आणि त्याचं नवं गाणं ‘सुरूर २०२१’चं भरभरून कौतुक केलं.

Himesh-Reshammiya-throwback-photo-viral-inside (Photo: Instagram@rarephotoclub)

या फोटोला काही तासांमध्येच लाखो लाइक्स मिळाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोपेक्षा फोटोवर येणाऱ्या कमेंट्स पाहणं मजेदार ठरतंय. सध्या हिमेश रेशमिया ‘इंडियन आयडल १२’ शोमध्ये परिक्षक म्हणून झळकतोय. याआधी तो ‘सारेगामापा चॅलेंज’, ‘द वॉइस इंडिया’ आणि ‘सुपरस्टार सिंगर’ या शोमध्ये परिक्षण करताना दिसून आला होता. हिमेशने चित्रपटांत देखील काम केलंय. यात ‘कर्ज’, ‘रेडिओ’, ‘द एक्सपोज’ या चित्रपटांचा समावेश आहे. हिमेशची सगळीच गाणी एव्हरग्रीन हिट ठरले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2021 7:45 pm

Web Title: singer himesh reshammiya and alka yagnik throwback photo viral twitter reaction prp 93
Next Stories
1 चहापानाला गेला आणि काढा पिऊन आला; मनीष पॉल आणि स्मृती इराणींच्या भेटीचा मजेदार किस्सा
2 घटस्फोटानंतर मिनिषा लांबा पुन्हा एकदा प्रेमात
3 जान्हवी कपूरच्या बिकिनी लूकपेक्षा सोबत असलेल्या मिस्ट्री मॅनची चर्चा
Just Now!
X