News Flash

राखीला किस ते दुबईमध्ये जेलची हवा, जाणून घ्या मिका सिंगच्या कॉन्ट्रोव्हर्सी

मिका सिंग आज १० जून रोजी वाढदिवस आहे. आज मिका त्याचा ४४वा वाढदिवस साजरा करत आहे.

आजा मिका सिंगचा ४४ वा वाढदिवस आहे.

बॉलिवूडमधील लोकप्रिय गायकांमध्ये मिका सिंग एक आहे. मिका सिंगचा आज १० जून रोजी वाढदिवस आहे. मिका त्याच्या गाण्यांमुळे जेवढा लोकप्रिय झाला. तेवढात कॉन्ट्रोव्हर्सीमुळे चर्चेत आला आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण मिका सिंगच्या कॉन्ट्रोव्हर्सींबद्दल जाणून घेणार आहोत.

सलमान खानप्रमाणेच मिका सिंगही हिट अँड रन या प्रकरणात होता. मिकाने त्याच्या गाडीने एका रिक्षाला धडक मारली होती. त्यावेळी रिक्षात असलेले लोक जखमी झाले होते. हिट अँड रन प्रकरणात अडकलेल्या प्रत्येक आरोपीप्रमाणे मिकानेही तो गाडी चालवत नव्हता असे सांगितले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mika Singh (@mikasingh)

मिका सिंगवर अनेक गंभीर आरोप केले गेले आहेत. एका मॉडेलने त्याच्यावर विनयभंगाचा आरोप केला होता. त्याचवेळी, २०१८ मध्ये १७ वर्षाच्या ब्राझीलच्या मॉडेलने मिकावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. मिकाविरूद्ध दुबईमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मिकाला तुरूंगवास झाला होता.

आणखी वाचा : रिचा चढ्ढाच्या सडेतोड उत्तरानंतर नेटकऱ्याने अभिनेत्रीला केलं ब्लॉक

तेवढंच नाही तर एकदा मिकाने लाइव्ह कॉन्सर्टमध्ये एका डॉक्टरला कानशिलेत लगावली होती. यावर प्रतिक्रिया देत मिका म्हणाला, की त्या डॉक्टराने त्याच्यासोबत गैरवर्तन केले होते. या प्रकरणावरून देखील मिकावर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती.

आणखी वाचा : ‘या’ अजब कारणामुळे शिल्पाने विकला बुर्ज खलिफामधील ५० कोटी रुपयांचा फ्लॅट

तर, मिका सिंग विरोधात अभिनेत्री राखी सावंतने ही तक्रार दाखल केली होती. २००६ मध्ये एका किसमुळे हे दोघे चर्चेत आले होते. मिकाने त्याच्या वाढदिवशी राखीला जबरदस्ती किस केलं अशी चर्चा सुरु झाली होती आणि त्यानंतर तो अडचणीत आला होता. राखीने मिका विरोधात विनयभंगाचा आरोप करत तक्रार केली होती. तर, मिकाने त्यावेळी स्पष्ट केले होते की राखीने आधी त्याला किस केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 11:26 am

Web Title: singer mika singh birthday controversy know some unknown facts dcp 98
Next Stories
1 ‘भाभीजी घर पर है’मधील अंगुरी भाभी इतकीच सुंदर आहे मनमोहन तिवारीची खऱ्या आयुष्यातील पत्नी!
2 रिचा चढ्ढाच्या सडेतोड उत्तरानंतर नेटकऱ्याने अभिनेत्रीला केलं ब्लॉक
3 “पावसाला एक अक्कल नाही…जास्त पडून तुंबई करतो”; केदार शिंदे यांचा बीएमसीला टोला
Just Now!
X