News Flash

सलमानचे ट्विट्स मला दाखवू नका; चिडलेल्या सोना मोहपात्राची ट्विटरला विनंती

सलमानचं ट्विट टाइमलाइनवर पाहून सोना मोहपात्रा चिडली.

सोना मोहपात्रा, सलमान खान

परखड मतं आणि बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाणारी गायिका सोना मोहपात्राने अभिनेता सलमान खानवर राग व्यक्त केला आहे. सलमानचे ट्विट्स मला दाखवू नका अशी विनंतीच तिने थेट ट्विटरला केली आहे.

सलमानला ट्विटरवर फॉलो करत नसतानाही टाइमलाइनवर त्याचे ट्विट्स पाहून सोना चिडली. त्याचा स्क्रिनशॉट शेअर करत तिने ट्विट केले, ‘प्रिय ट्विटर, मी या व्यक्तीला फॉलो करत नाही. तुम्हाला विनंती करते की कृपया तुमचे अल्गोरिदम एकदा तपासा आणि या व्यक्तीचे जाहिरातपर ट्विट माझ्या टाइमलाइनवर दाखवू नका.’

Video : कार्तिक-साराचा किसिंग व्हिडिओ लीक

सोना मोहपात्राने याआधीही सलमान खानवर निशाणा साधला होता. काळवीट शिकार प्रकरणानंतर, ‘आता वडील माफी मागणार का? आता या इंडस्ट्रीचं काय होणार? त्याला जामीन कधी मिळणार? त्याचा ब्लॉकबस्टर सिनेमा कधी प्रदर्शित होणार? चॅरीटी कार्यक्रम, दबंग कॉन्सर्ट, बिग बॉसच्या तारखा काय असतील?’ अशा उपरोधिक शब्दांत तिने टीका केली होती. सुलतान चित्रपटाच्या वेळी सलमाननं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ‘मला बलात्कार झालेल्या महिलेसारखं वाटतंय’ असं विधान सलमाननं करून जनसामान्यांचा रोष ओढवून घेतला होता. अखेर विविध स्तरातून झालेली टीका पाहता मुलाच्या मदतीला सलीम खान धावून आले होते. त्यांनी सलमानच्या वतीनं माफी मागितली होती. फेसबुक किंवा ट्विटरच्या माध्यमातून सेलिब्रिटींना खडेबोल सुनावण्यात सोना आघाडीवर असते .

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2019 1:16 pm

Web Title: singer sona mohapatra takes a dig at salman khan requests twitter to not show his tweets
Next Stories
1 ‘करण-अर्जुन’ला एकत्र आणण्यास भन्साळींना येणार का यश?
2 Video : कार्तिक-साराचा किसिंग व्हिडिओ लीक
3 सूडबुद्धीने पेटून उठलेली ‘मॅलेफिसन्ट’ परत येतेय
Just Now!
X