बक-याची कत्तल करणे म्हणजे कुर्बानी होत नाही. मुस्लिमांनी काहीतरी त्याग करण्याची परंपरागत पद्धत म्हणजे कुर्बानी असल्याचे अभिनेता इरफान खान याने म्हटले आहे. इरफानच्या या वक्तव्यानंतर वादाला तोंड फुटले आहे.
इरफान सध्या त्याच्या आगामी मदारी चित्रपटाच्या प्रसिद्धीकरिता जयपूरला पोहचला आहे. त्यावेळी तो बोलत होता. इरफान म्हणाला की, कुर्बानीचा अर्थ एखाद्या बक-याचा किंवा मेढींचा बळी देणे नसून तुम्ही तुमच्या जवळच्या गोष्टीचा त्याग करणे असा होतो. तुम्ही ज्या गोष्टीचा त्याग करत आहात त्याच्याशी तुमची जवळीक असली पाहिजे. निष्पाप प्राण्यांचा बळी देऊन तुमचा हेतू पूर्ण होणार नाही. गेल्या काही काळापासून आपण या धार्मिक विधींचा मूळ अर्थ समजून न घेता केवळ त्या विधी पूर्ण करण्याच्या मागे लागलो आहोत, असे इरफान डेक्कन हेराल्डशी बोलताना म्हणाला.
संग्रहित लेख, दिनांक 1st Jul 2016 रोजी प्रकाशित
बक-याची कत्तल म्हणजे ‘कुर्बानी’ नाही- इरफान खान
इरफानच्या या वक्तव्यानंतर वादाला तोंड फुटले आहे.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 01-07-2016 at 15:44 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Slaughtering of bakra does not mean qurbani irrfan khan