25 September 2020

News Flash

सोनम कपूरच्या नव्या सिनेमाला सचिनच्या शुभेच्छा, म्हणाला…

द झोया फॅक्टर हा क्रिकेट खेळावर आधारित चित्रपट आहे.

क्रिकेट हा भारतातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. या खेळाला भारतात अगदी एखाद्या धर्माचा दर्जा दिला जातो. या धर्माचे असंख्य अनुयायी भारतात आहेत. या तमाम क्रिकेट अनुयायांना खुश करण्यासाठी ‘द झोया फॅक्टर’ हा चित्रपट लवकरच येत आहे. क्रिकेट खेळाची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटाला सचिन तेंडूलकरने शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय क्रिकेटचा देव म्हणून गौरवल्या जाणाऱ्या सचिनने अभिनेत्री सोनम कपूरला ‘द झोया फॅक्टर’ या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. “मी आत्ताच द झोया फॅक्टर या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला. सोनम तुझ्या आगामी चित्रपटासाठी माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा” सचिनने अशा आशयाचे ट्विट करुन सोनम कपूरला प्रोत्साहित केले. सचिनच्या या ट्विटनंतर भारतीय फलंदाज के. राहूल व हार्दिक पांड्या यांनी देखील सोमनच्या अभिनयाचे कौतुक करत तिला आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या. सोनमने या शुभेच्छांचा स्वीकार करत त्यांना ट्विटरच्याच माध्यमातून धन्यवाद केले आहे.

‘द झोया फॅक्टर’ हा क्रिकेट खेळावर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटात सोनम कपूर व दुलकर सलमान मुख्य व्यक्तिरेखा साकारणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा याने केले असुन येत्या २० सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2019 9:33 am

Web Title: sonam kapoor sachin tendulkar the zoya factor mppg 94
Next Stories
1 लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या स्वरा भास्करची चप्पल चोरीला
2 नक्कल करु नको असं सांगणाऱ्या लतादीदींना रानू मंडल यांचे उत्तर, म्हणाल्या…
3 बसस्टॉप आणि ती मुलगी; बीग बींनी सांगितला कॉलेज जीवनातील खास किस्सा
Just Now!
X