News Flash

‘भगवान शंकराचा फोटो फॉर्वड करुन नाही…’, असे म्हणताच सोनू सूद झाला ट्रोल

ट्विटरवर हॅशटॅग 'WhoTheHellAreUSonuSood' टॉप ट्रेंड होताना दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो सतत सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संवाद साधत असून बऱ्याचवेळा त्यांना मदत करताना दिसतो. नुकताच सोनू सूदने महाशिवरात्री निमित्त एक ट्वीट केले होते. या ट्वीटमुळे त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

नुकताच सोनू सूदने ट्वीटरवर सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देत ट्वीट केले होते. या ट्वीटमध्ये त्याने ‘भगवान शंकराचा फोटो फॉरवर्ड करुन नाही, तर कोणाची तरी मदत करुन महाशिवरात्री साजरी करा’ असे म्हटले होते. दरम्यान नेटकऱ्यांनी सोनू सूदला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी त्याला तू आम्हाला सांगू नकोस असे म्हटले आहे.

ट्विटवर अनेकांनी सोनू सूदने नाताळ, ईदच्या शुभेच्छा देतानाचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. या स्क्रीनशॉट सोबतच ट्विटरवर हॅशटॅग ‘WhoTheHellAreUSonuSood’ टॉप ट्रेंड होताना दिसत आहे.

एका यूजरने ट्विटरवर ट्रेंड होत असलेला हॅशटॅग खूप काही सांगतो असे म्हटले आहे.

एका यूजरने तर हे खरच लज्जास्पद आहे असे म्हणत मी देखील ‘WhoTheHellAreUSonuSood’ या हॅशटॅगला पाठिंबा देतो असे म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 11, 2021 4:49 pm

Web Title: sonu sood gets trolled on twitter avb 95
Next Stories
1 ‘रुही’मध्ये मानले सुशांतसिंह राजपूतच्या मॅनेजरचे आभार
2 आईच्या आठवणीत ‘या’ अभिनेत्याची भावूक पोस्ट, “प्रत्येक आईत मला तूच दिसतेस”
3 रोमँटीक फोटो शेअर करत प्रितीने दिल्या पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Just Now!
X