लॉकडाउनमध्ये पतीसोबत राहून कंटाळलेल्या एका महिलेने थेट अभिनेता सोनू सूदला टॅग करून ट्विटरवर विनंती केली. ‘एकतर माझ्या पतीला बाहेर पाठव किंवा मला तरी माहेरी पाठव’, असं त्या वैतागलेल्या महिलेने ट्विट केलं. यावर सोनू सूदने भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. मदतकार्यासोबतच सोनू सूद ज्याप्रकारे सोशल मीडियावर चाहत्यांना उत्तरं देतोय, त्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
‘जनता कर्फ्यू पासून लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यापर्यंत मी माझ्या पतीसोबत राहतेय. तू कृपया त्याला बाहेर पाठवू शकतोस का किंवा मला तरी माहेरी पाठव कारण मी त्याच्यासोबत आणखी काळ नाही राहू शकत’, असं त्या महिलेनं ट्विट केलं. यावर सोनू सूदने चांगलाच उपाय शोधून काढला. ‘माझ्याकडे चांगला प्लान आहे. तुम्हा दोघांना मी गोव्याला पाठवतो. काय म्हणता?’, असं उत्तर सोनू सूदने त्या महिलेला दिलं.
I have a better plan .. let me send both of you to Goa What say? https://t.co/XbYNFWWflK
— sonu sood (@SonuSood) May 31, 2020
आणखी वाचा : बहिणीसंदर्भातील ‘त्या’ वृत्तावर भडकला अक्षय कुमार; म्हणाला..
गेल्या काही दिवसांपासून सोनू सूद लॉकडाउनमुळे अडकलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी देवदूत बनून आला आहे. या मजुरांना त्यांच्या गावी, त्यांच्या घरी सुखरुप पोहोचवण्याची व्यवस्था सोनू सूद करत आहे. या कामामुळे चर्चेत असलेल्या सोनू सूदसाठी ट्विटरवर भन्नाट ट्विट केले जात आहेत. या चाहत्यांना तो मनमोकळेपणाने उत्तरंसुद्धा देत आहे.