News Flash

सोनू सूदने लॉन्च केली ‘फ्री कोव्हिड हेल्प’ घरबसल्या मिळणार मदत

आता घरी बसल्या करा करोना टेस्ट

बॉलिवूडचा ‘मसीहा’ अर्थात सोनू सूदने यशस्वीरित्या कोरोनावर मात केल्यानंतर तो गरजू लोकांसाठी पुन्हा एकदा सक्रीय झालाय. करोना काळात लोकांना मदत करण्यासाठी तो लागोपाठ काम करतोय. गरजूंसाठी मसीहा बनलेला सोनू सूद लवकरच ‘फ्री कोव्हिड हेल्प’ लॉन्च करतोय.

देश सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेशी सामना करतोय. प्रत्येक ठिकाणी लोक मदत मिळवण्यासाठी धडपडत आहेत. आतापर्यंत नेहमीच गरजवंताच्या हाकेला धावून जाणारा बॉलिवूड अभिनेता सोनू सूद पुन्हा एकदा लोकांच्या मदतीसाठी पुढे आलाय. आता अभिनेता सोनू सूद ‘फ्री कोव्हिड हेल्प’ लॉन्च करणार आहे. याबाबतची माहिती स्वतः सोनू सूदने सोशल मिडीयावरून दिलीय.

सोनू सूदने आपल्या ऑफिशिअल ट्विटर हॅंडलवरून ट्विट करत लिहीलं की, ” तुम्ही आराम करा, आम्हाला टेस्ट करू द्या, HealWell24 आणि Krsnaa Diagnostics Pvt. Ltd. यांच्यासोबत ‘फ्री कोव्हिड हेल्प’ सुरू करतोय..”. यासोबतच सोनू सूदने एक फोटो शेअर केलंय. या फोटत या मोहीमेबद्दल सगळी माहिती देण्यात आलीये.

सोनू सूदने जी ‘फ्री कोव्हिड हेल्प’ सुरू केलीय, त्यामाध्यमातून लोकांना घरबसल्या मदत पुरवली जाणार आहे. यात तुम्ही डॉक्टरांसोबत बोलून सल्ला देखील घेऊ शकता. यासाठी एक टोल फ्री नंबर दिलाय. याशिवाय तुम्ही तुमची कोव्हिड टेस्टही करू शकता.

सोनू सूदने गेल्या शनिवारीच एक टेलिग्राम अ‍ॅप लॉन्च केलं आहे. ज्यात तो देशभरातील गरजू लोकांना रुग्णालयात बेड, औषधं आणि ऑक्सिजन मिळवून देण्यासाठी मदत केली जातेय. त्यानंतर गरजुंसाठी मदतीसाठी कामं लागोपाठ सुरू ठेऊन आज ‘फ्री कोव्हिड हेल्प’ लॉंच केलंय. यासाठी त्याने देशवासियांना त्याच्या मोहिमेत सामील होण्याचं आवाहन केलंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 1:04 pm

Web Title: sonu sood launches free covid help now get corona test done at home prp 93
Next Stories
1 साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला करोनाची लागण, सोशल मीडियावर चाहत्यांकडून चिंता व्यक्त
2 ‘तुम्ही मला बुधवार पेठेत कधी पाहिलं?’ ट्रोलरवर भडकली मानसी नाईक
3 प्रियांकाने शेअर केला ‘सिटाडेल’च्या सेटवरून BTS फोटो
Just Now!
X