26 February 2021

News Flash

Video : ‘मणिकर्णिका’मध्ये असा होता सोनू सूदचा लूक,व्हिडिओ व्हायरल

सोनूने चित्रपटातून काढता पाय घेतल्यानंतर ही भूमिका जीशान अयूबच्या वाट्याला आली.

सोनू सूद

अभिनयानंतर दिग्दर्शन क्षेत्रात नशीब आजमावणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतचा ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. ‘मणिकर्णिका’ हा कंगनाचा पहिलाच चित्रपट. मात्र या पहिल्याच प्रयत्नात कंगनाने स्वत:ला सिद्ध करुन दाखवलं. ‘मणिकर्णिका’ प्रदर्शित होण्यापूर्वी त्याला अनेक वादांना सामोरं जावं लागलं होतं. अनेक संस्थांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली होती. मात्र या वादावर मात करुन अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर आता या चित्रपटातील अभिनेता सोनू सूदचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या चित्रपटात सोनू वीर सदाशिवची भूमिका साकारणार होता. त्यासाठी त्याने तयारीही केली होती. त्याची ही मेहनत व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये सोनू जबरदस्त लूकमध्ये दिसत असून त्याची पिळदार शरीरयष्टी पाहुन अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. दरम्यान, सोनूने चित्रपटातून काढता पाय घेतल्यानंतर ही भूमिका जीशान अयूबच्या वाट्याला आली.

या चित्रपटामध्ये कंगना राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेत असून अंकिताने झलकारी बाईंची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये या दोघींव्यतिरिक्त अभिनेता सोनू सूददेखील झळकणार होता. त्याने या चित्रपटातील काही भागांचं चित्रीकरणही पूर्ण केलं होतं. मात्र काही कारणास्तव त्याने या चित्रपटातून काढता पाय घेतला होता.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2019 5:52 pm

Web Title: sonu sood look from manikarnika
Next Stories
1 ….आणि सात वर्षांनंतर जुही-आमिरमधला वाद मिटला
2 Video : ‘सावट’ चित्रपटाचा चित्तथरारक टीझर प्रदर्शित
3 आयुष शर्मा घेणार टायगर श्रॉफच्या ट्रेनरकडून फिटनेस ट्रेनिंग
Just Now!
X