News Flash

मलाही इथे सेल्फी काढायची आहे…!; सोनू सूदने व्यक्त केली मनातली इच्छा

भिंतीवरील चित्रासोबत फॅनचा फोटो सोनू सूदने केला शेअर. स्वतःच्याच चित्रासोबत सोनू सूदला काढायचीय सेल्फी.

करोना काळात लोकांना मदत करून बॉलिवूडमधील अभिनेता सोनू सूद ‘देवदूत’ बनला आहे. करोना काळात लोकांच्या मदतीसाठी सोनू सूद त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर कायम सक्रिय असतो. करोना काळात सुरू असलेल्या त्याच्या कामाचं अनेक स्तरातून कौतूक केलं जातंय. सोनू सूदने आपल्या कामाने बर्‍याच लोकांची मने जिंकली आहेत. सोनू सूद अधून मधून त्याच्या फॅन्सचे वेगवेगळे फोटोज आणि व्हिडीओज शेअर करत असतो. नुकतंच त्याने त्याच्या एका फॅन्सचा फोटो शेअर केलाय आणि त्याला ही तिथे सेल्फी काढायची आहे, अशी इच्छा व्यक्त केलीय.

अभिनेता सोनू सूदने त्याच्या ट्विटर अकाउंटवर एका फॅनचा फोटो शेअर केलाय. सोनू सूदची वाढती फॅन फॉलोइंग पाहता प्रत्येक जण सोनू सूदसाठी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून शुभेच्छा देत त्याला ट्विटरवर टॅग करत असतात. सोनू सूदने शेअर केलेल्या या फोटोमध्ये एका भिंतीवर सोनू सूदचं भव्य चित्र रेखाटण्यात आलंय आणि या ठिकाणी सोनू सूदच्या जबराट फॅन्सनी तिथे उभा राहून हा फोटो काढलेला आहे. त्याच्या फॅन्सनी हा फोटो ट्विटर अकाउंटवर शेअर करताना अभिनेता सोनू सूदला देखील टॅग करून करोनाकाळातील त्याच्या कामांसाठी शुभेच्छा दिल्या. हा फोटो पाहून अभिनेता सोनू सूदला देखील भावना अनावर झाल्या आणि त्याच्या ट्विटर अकाउंटवर हा फोटो त्याने शेअर केला. तसंच भिंतीवर त्याचं चित्रं रेखाटण्यात आलेल्या ठिकाणी त्याला सुद्धा एक सेल्फी काढायची आहे, अशी इच्छा देखील त्याने व्यक्त केली.

दरम्यान, सोनू सूदने हा फोटो शेअर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकजण यावर प्रतिक्रिया देत असून सोनू सूदचं कौतुक देखील करत आहेत. सोनू सूदच्या या पोस्टमुळे त्याचे चाहते त्याचे देखील कौतुक करत आहेत. त्याचबरोबर कोरोनाच्या काळात त्याने केलेल्या समाजसेवेमुळे अजूनही नागरिक त्याचे अभिनंदन आणि आभार मानत आहेत. सोनू सूद आपल्या अनेक चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तर देखील देत असतो. असेच काही दिवसांपूर्वी त्याने सिमकार्डवर आपला फोटो काढणाऱ्या मुलाचे आभार मानत फोटोदेखील शेअर केला होता.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2021 1:40 pm

Web Title: sonu sood posts images of fans taking a selfie with his mural and says he wants one too prp 93
Next Stories
1 ‘जागतिक संगीत दिना’च्या निमित्ताने सावनी रविंद्रचं मल्याळम गाणं रिलीज
2 ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ टप्पू आज आहे बेरोजगार
3 ‘अक्षयला गरीबांचा मिथुन चक्रवर्ती बोलायचे; माझ्या गाण्यांमुळे…’, अभिजीत भट्टाचार्य
Just Now!
X