News Flash

VIDEO: जबराट फॅनकडून सोनू सूदला हटके सोल्यूट; भिंतीवर रेखाटलं चित्र

सोनू सूद म्हणाला, भेटूया लवकरंच...

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद गेल्या वर्षभरापासून करोना काळात गरीब, गरजू आणि अडचणीत आलेल्या लोकांच्या मदतीसाठी धडपड करत आहे. त्यानंतर तो जगभरात चर्चेत आला. त्याला गरिबांचा ‘मसीहा’ देखील म्हणतात. सोनू सूद अजूनही लोकांच्या मदतीसाठी नेहमी पुढे असतो. सोनू सूदने कशाचीही पर्वा न करता लोकांना भरभरून मदत केली. त्यामुळे करोना काळात त्याचं सुरू असलेलं काम पाहून आता जगभारातून त्याचे फॅन्स तयार झाले आहेत. अनेक स्तरातून त्याचं कौतूक केलं जातंय. नुकतंच त्याच्या एका जबराट फॅनने भिंतीवर त्याचं चित्र रेखाटून अनोख्या पद्धतीने त्याला सोल्यूट ठोकलाय. सोनू सूदच्या या फॅनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.

सोमिन जैन असं या जबराट फॅनचं आहे. तो जबलपूरमधल्या सराफा इथे राहणारा असून तो फाईन आर्टचा विद्यार्थी आहे. तो राहत असलेल्या घरातील छताच्या भिंतीवर त्याने सोनू सूदचं हे चित्र रेखाटलंय. जवळजवळ गेल्या १५ दिवसांपासून सोमिन प्रत्येक दिवसातले दोन तास या वॉल पेंटींगसाठी देत होता. करोना काळात अभिनेता सोनू सूद अगदी देवदूताप्रमाणेच गरजूंची विविधप्रकारे मदत करतोय, यासाठी त्याने मागचा पुढचा विचार न करता आपली स्वतःची मालमत्ता गहाण ठेवून गरिबांसाठी ऑक्सिजन आणि उपयोगी वस्तूंचा पुरवठा सुरू ठेवला. म्हणूनच त्याला सोल्यूट करण्यासाठी या अवलिया कलाकारने हे वॉल पेंटिग साकारले आहे. लहानपणापासून चित्रकलेचा छंद जडलेल्या सोमिनने पेंटिग करतानाचा एक व्हिडीओ त्याच्या ट्विटर अकाउंट शेअर करून अभिनेता सोनू सूदला देखील टॅग केलं. त्यानंतर सोनू सूदच्या या सुंदर पेंटिंगवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव करत त्याच्या कलेचं कौतुक केलं आहे.

सोनू सूदने दिली ही प्रतिक्रिया
सोमिन जैनने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अभिनेता सोनू सूदने ही स्वतः या फॅनचा व्हिडिओ त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आणि त्याची माहिती आपल्या इतर चाहत्यांना दिली. सोबतच हा व्हिडीओ शेअर करताना त्याने एक कॅप्शन देखील लिहिली आहे. “भेटूया लवकरच जबलपुरमध्ये” असं त्याने या कॅप्शनमध्ये लिहिलंय. सोनू सूदच्या या फॅनने त्याचा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, “तु्म्ही जे काम करत आहात त्यापुढे माझं हे आर्ट खूपच छोटं आहे, जबलपुरमध्ये एकदा नक्की भेट द्या सर”. त्याला उत्तर म्हणून सोनू सूदने व्हिडीओ शेअर करताना ती कॅप्शन लिहिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2021 8:47 pm

Web Title: sonu soods fans give salute from wall painting on his home prp 93
Next Stories
1 ‘फ्रेंड्स रियुनियन’ ही मालिका नसून टॉक शो आहे…; हे कळल्यानंतर कतरिनाची बहिण इसाबेला नाराज
2 ‘या’ अभिनेत्रीमुळे के. एल. राहुल आणि अथिया शेट्टीच्या नात्यात आला दुरावा?
3 सनी लिओनीच्या गाऊनची चेन अडकली, मदतीसाठी आख्खी टीम सरसावली!
Just Now!
X