25 September 2020

News Flash

कंगना आणि वडिलांच्या नात्याविषयी सूरज पांचोलीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

सूरज पहिल्यांदाच या विषयावर व्यक्त झाला

अभिनेत्री कंगना रणौतच्या खासगी आयुष्याविषयी सध्या बऱ्याच चर्चा रंगत आहेत. ज्यावेळी कंगनाने कलाविश्वात पदार्पण केलं त्यावेळी तिच्या आणि अभिनेता आदित्य पांचोली यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. इतकंच नाही तर कंगनाने काही मुलाखतींमध्ये आदित्य पांचोलीसोबत असलेल्या नात्याविषयीचा खुलासादेखील केला होता. मात्र काही कारणास्तव त्यांच्या नात्यात दुरावा आला. परिणामी, या दोघांनी  एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली. मात्र या साऱ्यावर आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोलीने पहिल्यांदाच मौन सोडलं आहे. एका मुलाखतीमध्ये त्याने याविषयी त्याचं मत मांडलं.

“अभिनेत्री कंगना रणौतसोबत माझ्या वडिलांचं नाव जोडलं गेलं. त्याच्याविषयी अनेक उलट-सुलट चर्चा रंगल्या या साऱ्या गोष्टींचा मला आणि माझ्या कुटुंबियांना प्रचंड त्रास झाला. इतकंच नाही तर आमच्या मनावर प्रचंड आघात झाला. या सगळ्यामुळे आम्हाला मनस्ताप तर झालाच पण त्याहीपेक्षा वाईट जास्त वाटलं”, असं सूरजने सांगितलं.

पुढे तो म्हणाला, “मी माझा बराचसा वेळ आजी-आजोबांसोबत व्यतीत केली आहेत. त्यातच माझ्या वडिलांचं अफेअर किंवा त्यांच्याविषयी होणारी चर्चा ही त्यांची खासगी गोष्ट आहे. यापैकी काही गोष्टी मला खटकल्या किंबहुना आजही खटकत आहेत. पण या साऱ्यातून माझे आई-वडील नक्कीच बाहेर पडतील असा मला विश्वास आहे”.

दरम्यान, कंगना आणि आदित्य पांचोली जवळपास ४ वर्ष एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. मात्र कालांतराने त्यांच्या नात्यात दुरावा आला. त्यानंतर मात्र अनेक कार्यक्रमांमध्ये दोघांनीही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2019 10:32 am

Web Title: sooraj pancholi on his father aditya pancholi link up with kangana ranaut ssj 93
Next Stories
1 आकाश ठोसर रणवीरला का म्हणतोय, ‘Sada Sexy Raho Man’
2 Photo : पाहा, अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या लहानपणीचा फोटो
3 बालरंगभूमी शोकांतिका की सुखांतिका!
Just Now!
X