News Flash

‘हेरा फेरी’ला २१ वर्षे पूर्ण, सुनील शेट्टी-अक्षय कुमारने पोस्ट शेअर करताच मीम्सचा पाऊस

हे मीम्स पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल

बॉलिवूड इतिहासातील आजवरच्या सर्वोत्कृष्ट विनोदीपटांपैकी एक ‘हेरा फेरी’ या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आज २१ वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात अभिनेते परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी हे मुख्य भूमिकेत आहेत. आजही हा चित्रपट चाहते आवडीने पाहतात. ‘हेरा फेरी’ चित्रपटाला आज ३१ मार्च रोजी प्रदर्शित होऊन २१ वर्षपूर्ण झाल्यामुळे अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे आनंद व्यक्त केला आहे. तसेच नेटकऱ्यांनी काही मीम्स देखील तयार केले आहेत.

सुनील शेट्टीने चित्रपटातील एका सीनचा फोटो शेअर केला आहे. तो शेअर करत, ‘वेळ किती पटापट निघून जातो. २१ वर्षे कधी उलटली कळलंही नाही. गुलशन ग्रोवर, परेश रावल सर, अक्षय कुमार, प्रियदर्शन आपण मस्त चित्रपट तयार केला होता. आज मला दिवंगत अभिनेते ओम पूरी यांची आठवण येत आहे’ असे कॅप्शन दिले आहे.

अक्षयने सुनीलच्या या ट्वीटला रिट्वीट केले आहे. ‘मी तुझ्याशी सहमत आहे. त्यावेळी आम्हाला माहिती देखील नव्हते आपण इतक्या चांगल्या चित्रपटात काम करत आहोत. प्रत्येक सीन आणखी कसा चांगला होईल याकडे आपले लक्ष होते’ असे तो म्हणाला.

अक्षय आणि सुनीलच्या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी देखील त्यांचे आवडते डायलॉग आणि सीन्सवरील मीम्स शेअर केले आहेत. एका नेटकऱ्याने तर ‘हा मास्टरपीस पाहून मी मोठा झालो आहे’ असे म्हटले आहे.

३१ मार्चे २००० मध्ये ‘हेरा फेरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळी या चित्रपटाने अनेकांची मने जिंकली होती. या चित्रपटात अभिनेता परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनिल शेट्टी यांनी अफलातुन अभिनयाचे प्रदर्शन केले आहे. हा चित्रपट बॉलिवूड इतिहासातील आजवरच्या सर्वोत्कृष्ट विनोदीपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2021 3:43 pm

Web Title: suniel shetty becomes nostalgic on 21st anniversay of hera pheri memes viral on movie avb 95
Next Stories
1 अनुष्काचा चित्रपटसृष्टीला रामराम?; सिमी गरेवालच्या त्या मुलाखतीमळे चर्चा
2 ‘तारे जमीन पर’वरुन आमिरसोबत झालेल्या वादावार अमोल गुप्तेंनी सोडलं मौन
3 ऋषी कपूर आणि नीतू यांचं चित्रपटाच्या सेटवरच झालं होतं ब्रेकअप
Just Now!
X