News Flash

सुनील ग्रोवर- अक्षय कुमार एकत्र येणार?

सुनीलने 'द कपिल शर्मा शो' सोडला आणि त्याच्यासाठीची मागणी दुप्पटीने वाढली

अक्षय कुमार आणि सुनील ग्रोवर

सुनील ग्रोवरने ‘द कपिल शर्मा शो’ सोडला आणि त्याच्यासाठीची मागणी दुप्पटीने वाढली. एकीकडे कपिल शर्माला त्याचा शो टिकवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहेत तर दुसरीकडे सुनील लाइव्ह शो आणि पाहुण्या कलाकार होऊन जास्तीच मानधन घेत आहे. कपिलच्या मागे असणारं दृष्टचक्र कमी होतं की काय आता त्यात अजून एकाची भर पडणार आहे, ती म्हणजे सुनीलचा येणार नवीन कॉमेडी शो.

‘हे बेबी’मधील ‘ऐंजल’ आठवते का?

हे तर आपल्या सर्वांनाच माहित आहे की बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार लवकरच ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या टिव्ही शोमध्ये छोट्या पडद्यावर येणार आहे. या शोचे सूत्रसंचालन आता सुनील ग्रोवर करणार असल्याचे म्हटले जात आहे. सुरूवातीला या शोचे सूत्रसंचालन एली अवराम करणार असल्याचे म्हटले जात होते. पण आता या शोच्या टीमने एलीला बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

सप्टेंबर महिन्यात या शोला सुरूवात होणार आहे. त्यामुळे सुनील ग्रोवर आता या शोमध्ये येण्यासाठी पूर्णपणे तयार झाला आहे. या शोमध्ये अक्षय कुमार परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षयसोबत या शोमध्ये जाखीर खान, मल्लिका दुआ आणि हुसैन दलालदेखील दिसतील.

‘द कपिल शर्मा शो’मध्ये सुनीलने साकारलेल्या सर्व भूमिकांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. सर्वांत आधी गुत्थी, त्यानंतर रिंकू भाभी आणि डॉक्टर मशहूर गुलाटीची भूमिका सुनीलने साकारली होती.

…हे आहेत बॉलिवूडचे ‘इंजिनिअर’ कलाकार

दरम्यान, ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ या सिनेमाने १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. स्वच्छ भारत अभियानाचा संदेश देणाऱ्या या सिनेमात अक्षय कुमारसोबत भूमी पेडणेकर, अनुपम खेर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सध्या अक्षय या सिनेमाला मिळालेल्या यशाचे सेलिब्रेशन करण्यात व्यग्र आहे असेच म्हणावे लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 10:22 pm

Web Title: sunil grover and akshay kumar will senn in the great indian laughter challenge 5
Next Stories
1 या गोष्टींसाठी दिव्यांकाने मागितली पंतप्रधानांकडे मदत
2 अबब… सनी लिओनीला पाहण्यासाठी एवढी गर्दी!
3 ३२७ मराठी गायकांनी केला नवा ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’
Just Now!
X