News Flash

कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवरमधला वाद मिटला, पुन्हा शोमध्ये दिसणार एकत्र?

२०१६-१७मध्ये कपिलसोबत भांडण झाल्यामुळे सुनील ग्रोवरने शो सोडण्याचा निर्णय घेतला होता.

२१ जुलै पासून पुन्हा द कपिल शर्मा शोचा नवीन सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कॉमेडी शो म्हणजे ‘द कपिल शर्मा’ शो. या शोमध्ये कपिल शर्मा आणि त्याची संपूर्ण टीम प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करत असते. पण कपिल आणि सुनील ग्रोवर यांच्यामध्ये वाद झाल्यामुळे सुनीलने शो सोडला होता. आता गेल्या काही दिवसांपासून सुनील ग्रोवर पुन्हा एकदा ‘द कपिल शर्मा’ शो मध्ये दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. कपिल आणि सुनीलमधील वाद मिटला असल्याचे म्हटले जाते.

नुकताच सुनील ग्रोवरने यावर वक्तव्य केले आहे. ‘जर भविष्यात एखादा चांगला प्रोजेक्ट मिळाला तर कपिलसोबत नक्की काम करेन’ असे सुनील ग्रोवरने म्हटले आहे. लवकरच कपिल शर्मा त्याचा कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा’चे नवीन सिझन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर सुनील ग्रोवर ‘सनफ्लॉवर’ या सीरिजमध्ये दिसणार आहे.

आणखी वाचा : ‘बहुत मर्डर हो रहे है आजकल’, सुनील ग्रोवरच्या ‘सनफ्लॉवर’ सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

सुनील ग्रोवरने आरजे सिद्धार्थशी गप्पा मारल्या. दरम्यान त्याला कपिल शर्मा शोमध्ये परत येण्याबाबत काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर त्याने ‘सध्या तरी कपिल शर्मा शोमध्ये येण्याचा कोणाताही प्लॅन नाही. पण कधी पुन्हा एकत्र काम करण्याची संधी मिळाली तर नक्की करेन’ असे म्हटले आहे.

‘द कपिल शर्मा’ शोमध्ये सुनील ग्रोवर डॉ. गुलाटी, गुत्थी आणि रिंकू या भूमिकांमध्ये दिसला होता. पण २०१६-१७मध्ये कपिलसोबत भांडण झाल्यामुळे सुनील ग्रोवरने शो सोडण्याचा निर्णय घेतला.

२१ जुलै पासून पुन्हा द कपिल शर्मा शोचा नवीन सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १५ मे पासून शोचे चित्रीकरण सुरु झाल्याचे म्हटले जाते. या वेळी शोमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये शोबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 1:07 pm

Web Title: sunil grover on reuniting with kapil sharma avb 95
Next Stories
1 Dilip Kumar Health Update: ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना आज मिळणार रुग्णालयातून डिस्चार्ज
2 जॅकलिनच्या ‘पाणी पाणी’ गाण्याच्या रिहर्सल व्हिडीओवर राखी सावंतची भन्नाट कमेंट, म्हणाली..
3 “मला तिथे कोणी तरी असल्याचा भास झाला”; रणवीरने सांगितला ‘बाजीराव मस्तानी’च्या सेटवरचा भयानक किस्सा
Just Now!
X