आपल्या दिलखेचक अदांनी लाखो तरुणांना घायाळ करणारी अभिनेत्री सनी लिओनी आगामी चित्रपटातील एका खास गाण्यात मत्स्यकन्येच्या रुपात पाहायला मिळणार आहे. ऋषी कपूर, सनी सिंग आणि ओमकार कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘झूठा कहीं का’ या चित्रपटातील एका गाण्यात सनी झळकणार आहे.

या खास गाण्याचं शूटिंग थायलंडमध्ये करण्यात आलं आहे. सनी आणि ओमकार यांच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आले असून हनी सिंगने गाणं गायलं आहे. हनी सिंगने या गाण्यात प्रसिद्ध बडबडगीत ‘मछली जल की रानी है’ या ओळींचाही समावेश केला आहे. गाण्याच्या बोलनुसार सनी यामध्ये मत्स्यकन्येच्या रुपात दिसणार असून तिच्यासाठी खास तसे कपडे तयार करण्यात आले आहेत.

sunny leone सनी लिओनी[/caption]

‘हनी सिंगची प्रत्येक गाणी लोकांच्या पसंतीस उतरतात. हे गाणंसुद्धा चाहत्यांना आवडेल अशी खात्री आहे. मत्स्यकन्या साकारणं हा माझ्यासाठी एक नवीन अनुभव होता. माझ्या या नव्या लूकविषयी चाहत्यांना काय वाटतं हे जाणून घेण्याची मला फार उत्सुकता आहे,’ अशी प्रतिक्रिया सनीने दिली.

‘झूठा कहीं का’ या चित्रपटाचं दिग्दर्शन स्मीप कांग करत असून यामध्ये जिमी शेरगीलचीही भूमिका आहे. ८ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.