News Flash

अबब… सनी लिओनीला पाहण्यासाठी एवढी गर्दी!

गाडीला कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचणेही कठीण झाले होते

सनी लिओनी

बॉलिवूडची ‘लैला’ अर्थात सनी लिओनीची क्रेझ लोकांमध्ये एवढी आहेत की तिची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते काहीही करायला तयार असतात. तुम्हाला कदाचित आमचं हे म्हणणं चुकीचं वाटेल पण असं अजिबात नाहीये. नुकतीच सनी कोचीला एका कार्यक्रमासाठी गेली होती. तिथे तिला भेटण्यासाठी चाहत्यांनी एवढी गर्दी केली होती की त्या गर्दीत तिची गाडी अडकून राहिली.

‘हे बेबी’मधील ‘ऐंजल’ आठवते का?

सनीला ओझरतं का होईना पाहण्यासाठी तिचे शेकडोंनी चाहते रस्त्यावर आले होते. तिच्या गाडीला कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचणेही कठीण झाले होते. सनीने तिच्या इन्स्टग्राम अकाऊंटवर गर्दीची झलक दाखवणारा फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. हे फोटो शेअर करताना तिने लिहिले की, ‘चाहत्यांना धन्यवाद देण्यासाठी आज माझ्याकडे खरेच शब्द नाहीयेत. मी त्यांचे माझ्यावरी प्रेम आणि सहकार्य पाहून फारच खूश आहे. देवाची नगरी असणाऱ्या केरळला मी कधीच विसरणार नाही. धन्यवाद.’ सनी ज्या कार्यक्रमाला गेली होती तेथे पोहोचल्यावर उपस्थित चाहत्यांनी वी लव्ह सनी असे नारे द्यायला सुरूवात केली.

सनीसाठी हे वर्ष फारच चांगले आहे असे म्हणावे लागेल. शाहरुख खानसोबत ‘रईस’ सिनेमात आयटम साँग केल्यानंतर आता तिचे ‘बादशाहो’ सिनेमातील गाणे प्रदर्शित झाले. या गाण्याची झिंग उतरते न उतरते तोच संजय दत्तच्या ‘भूमी’ सिनेमातही तिचे गाणे पाहायला मिळणार आहे. याशिवाय लवकरच ती अभिनेता अरबाज खानसोबत ‘तेरा इंतजार’ सिनेमात दिसेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 8:52 pm

Web Title: sunny leone reaches kochi the number of fans will make your jaws drop to the floor
Next Stories
1 ३२७ मराठी गायकांनी केला नवा ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’
2 एमा स्टोन ठरली सर्वात जास्त कमाई करणारी अभिनेत्री
3 …हे आहेत बॉलिवूडचे ‘इंजिनिअर’ कलाकार
Just Now!
X