News Flash

Birthday Special : पर-पुरूषांसोबत सनीचे पॉर्न फिल्ममध्ये काम करणे डॅनियलला नव्हते पसंत म्हणून..

सनीचा आज १३ मे रोजी वाढदिवस आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचा आज १३ मे रोजी वाढदिवस आहे. सनी यंदा ४० वा वाढदिवस साजरा करतं आहे. सनी ही चित्रपटातील बोल्ड अंदाजामुळे कायमच चर्चेत असते. सनीचे लाखो चाहते आहेत. चित्रपटसृष्टीत येण्याआधी सनी पॉर्न फिल्ममध्ये काम करायची या बद्दल सगळ्यांना ठाऊक आहे. याबद्दल एका मुलाखतीत सनीने एक मोठा खुलासा केला आहे.

तिचा पती डॅनियलला हे काम आवडतं नव्हते म्हणून तिने ते काम केल्याचे थांबल्याचे सनीने सांगितले. “डॅनियलने मला नेहमीच पाठिंबा दिला आहे,” असे सनी म्हणाली. दरम्यान, पॉर्न फिल्ममध्ये तिने पर-पुरुषासोबत काम केलेले डॅनियलला आवडायचे नाही, म्हणून त्यानंतर त्या दोघांनी एकत्र काम करण्याच ठरवलं आणि अशा प्रकारे त्या दोघांनी मिळून एक नवीन कंपनी सुरू केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

सनीने पुढे तिच्या आणि डॅनियलची भेट कशी झाले हे सांगितले. सनी म्हणाली, “आम्ही दोघे डॅनियलच्या बॅंडमध्ये असलेल्या त्याच्या मित्रांमुळे लासवेगसमधल्या एका क्लबमध्ये भेटलो होतो. मला पहिल्यांदा पाहताच डॅनियल माझ्या प्रेमात पडला होता. पण माझ्या मनात असे काही नव्हते. त्याचवेळी डॅनियलने कसा तरी माझा नंबर आणि ईमेल आयडी मिळवला. त्याच्याकडे माझा नंबर असूनही त्याने मला ईमेल केला होता, आणि अशा प्रकारे आम्ही बोलायला सुरुवात केली.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

सनी लिओनी आणि डॅनियल यांनी २०११ मध्ये लग्न केले. त्यांना तीन सुंदर मुलेही आहेत. मोठ्या मुलीचे नाव निशा कौर वेबर आहे. निशाला त्यांनी दत्तक घेतले आहे. तर सरोगेसीच्या माध्यमातून त्यांना जुळी मुलं झाली. सनी नेहमीच सोशल मीडियावर आपल्या मुलांसोबतचे अनेक फोटो शेअर करते.

आणखी वाचा : ‘चुलबुल पांडे’ला घरी घेऊन गेलो तर आई कानशिलात लगावेल, सलमान खानचा खुलासा

सनी लवकरच ‘अनामिका’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक विक्रम भट्ट आहेत. सनीसोबत अभिनेत्री सोनाली सहगल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त सनी कॉमेडी हॉरर चित्रपट ‘कोका कोला’, ‘रंगीला’ आणि ‘वीरम्मादेवी’मध्ये दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 10:05 am

Web Title: sunny leone revealed that her husband daniel did not like her work in adult films dcp 98 2
Next Stories
1 भाईजानने चाहत्यांकडूनच मागितली कमिटमेंट, राधेच्या रिलीजपूर्वी सलमानने शेअर केला व्हिडीओ
2 अभिनेता राजीव पॉलला करोनाची लागण, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
3 “प्रतिमा बनवणं नव्हे तर जीव वाचवणं जास्त गरजेचं”, अनुपम खेर यांची मोदी सरकारवर टीका
Just Now!
X