News Flash

कंडोम जाहिरातीच्या वादावर सनी लिओनीचे सडेतोड प्रत्युत्तर

भाकपचे ज्येष्ठ नेते अतुलकुमार अंजन यांना सनीचे सडेतोड प्रत्युत्तर

सनी लिओनीच्या कंडोमच्या जाहिरातीमुळे देशात बलात्कार वाढतील असे तर्कट मांडून खळबळ उडवून देणारे भाकपचे ज्येष्ठ नेते अतुलकुमार अंजन यांना सनीने सडेतोड प्रत्युत्तर दिले. गरजूंना मदत करण्याऐवजी सत्ताधारी माझ्यावर त्यांचा वेळ आणि उर्जा वाया घालवत आहेत. याचं दु:ख मला वाटतं, असे ट्विट सनीने केले आहे.


उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथे आयोजित सभेत बोलताना अंजनकुमार यांनी सनीवर टीका केली होती. सनी लिओनी समाजात अश्लिलता पसरविण्याचे काम करीत असून संस्कृती बिघडवणाऱया अशा व्यक्तीचा कोणत्याही प्रकारे सन्मान होता कामा नये, असे अंजनकुमार म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर समाजमाध्यमांतून टीका होण्यास सुरूवात झाल्यानंतर आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याची सारवासारव अंजनकुमार यांनी केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2015 1:51 pm

Web Title: sunny leone slams atul kumar anjan over condom advertisement
टॅग : Sunny Leone
Next Stories
1 शाहरुखची व्हॅनिटी व्हॅन चार कोटी रुपयांची!
2 सेलिब्रिटींचे आयुष्य म्हणजे एकटेपणा आणि असुरक्षितता! – अमिताभ बच्चन
3 दाक्षिणात्य अभिनेत्याचे मराठी सिनेमासाठी दिग्दर्शन!
Just Now!
X