06 July 2020

News Flash

सनी लिओनी अभिनय करणार

पोर्नजगतातील लोकप्रिय पोर्नस्टार सनी लिओनी आणि अभिनय करण्याची अपेक्षा तिच्याकडून कशी काय केली जाऊ शकते असे प्रेक्षकांना वाटेलही कदाचित. परंतु, आतापर्यंत बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यापासून पोर्नस्टार

| October 29, 2014 06:34 am

पोर्नजगतातील लोकप्रिय पोर्नस्टार सनी लिओनी आणि अभिनय करण्याची अपेक्षा तिच्याकडून कशी काय केली जाऊ शकते असे प्रेक्षकांना वाटेलही कदाचित. परंतु, आतापर्यंत बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यापासून पोर्नस्टार असल्यामुळे अंगप्रदर्शन करणारी ललना अशाच व्यक्तिरेखा तिला मिळाल्या. परंतु, आता मात्र सनी लिओनीला अभिनय करण्याची संधी आगामी चित्रपटातून मिळणार आहे. बॉलीवूडवाल्यांनीही तिच्या पोर्नस्टार प्रतिमेचा पुरेपूर वापर चित्रपट लोकप्रिय करण्यासाठी केला असून आता प्रथमच तिच्यातील अभिनय गुण लोकांसमोर आणण्याची तयारी एका निर्मात्याने केली आहे.
‘बेईमान लव्ह’ या आगामी हिंदी चित्रपटात सनी लिओनी आजच्या काळातील करिअरभिमुख स्त्रीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. चित्रपटाच्या शीर्षकावरून भावनिक प्रेमकथा असा विषय असला तरी या चित्रपटात सनी लिओनी मध्यांतरापर्यंत करिअरसाठी झगडणारी स्त्री आणि मध्यांतरानंतर एक यशस्वी उद्योजिका अशा दोन रूपात लोकांसमोर येणार आहे. सनी लिओनीच्या चाहत्यांसाठी ही व्यक्तिरेखा निश्चितपणे तिच्या प्रतिमेला छेद देणारी ठरण्याची दाट शक्यता आहे. परंतु, आपणही अभिनय करू शकतो हे दाखविण्याची संधी सनी लिओनीला या चित्रपटामुळे मिळणार आहे हेही तितकेच खरे आहे.
आजच्या जमान्यात महिला-तरुणी प्रेम आणि विवाह यापेक्षा करिअरला किती महत्त्व देतात हे अधोरेखित करणारा हा चित्रपट असून ‘पिझ्झा थ्रीडी’ चित्रपटातून दिसलेला अक्षय ओबेरॉय हाही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. राजीव चौधरी यांनी ‘बेईमान लव्ह’ या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक-निर्माते अशी तिहेरी भूमिका बजावणार आहेत. पोर्नस्टार या आपल्या प्रतिमेला छेद देऊन उद्योजिकेची व्यक्तिरेखा सनी लिओनी साकारणार हे तिच्यासाठी आव्हानात्मक ठरणार असून त्याचबरोबर तिला प्रेक्षक स्वीकारतील का हाही कुतूहलाचा विषय ठरणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईत डिसेंबरपासून सुरू केले जाणार असून पुढील वर्षी जुलै महिन्यात चित्रपट प्रदर्शित केला जाईल, असे समजते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2014 6:34 am

Web Title: sunny leone will concentrate on acting
Next Stories
1 भूषण कडू आणि संजय नार्वेकर यांचे सर्किट हाऊस
2 यशप्राप्तीसाठी घर व काम यांची सुसूत्रता आवश्यक
3 बिग बॉस फेम सना खानला अटक
Just Now!
X