X

सनी लिओनीच्या मुलीला पाहून नेटकरी म्हणाले; “लहान असून निशा किती…”

सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय व्हायरल.

सनी लिओनी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सनी तिच्या मुलांसोबत अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसते. सनीला तिच्या पती आणि मुलांसोबत अनेकदा स्पॉट केलं जातं. नुकतचं सनीच्या पतीला म्हणजेच डॅनिअलला एअरपोर्टवर त्यांच्या तीनही मुलांसोबत स्पॉट करण्यात आलंय. यावेळी सनीच्या मोठ्या मुलीने म्हणजेच निशाने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. यावेळी निशाने असं काही केलं ज्यामुळे तिचं सोशल मीडियावर कौतुक होतंय.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने शेअर केलेल्या एका व्हिडीओत डॅनिअल गाडीतून उतरून विमानतळाकडे जाताना दिसतोय. यावेळी डॅनिअल निशाचा आणि एका मुलाचा हात पकडतो. मात्र एवढ्यात त्यांचा तीसरा मुलगा पुढे चालू लागतो. हे पाहताच निशा लगेच त्याचा हात पकडते आणि त्याला एका जागी थांबवते. पुढे डॅनिअलच्या हातून निशाचा हात सुटतो. मात्र निशा लहाग भावाचा काही हात सोडत नाही. पुढे पळणाऱ्या लहान भावाचा हात तिने घट्ट पकडून ठेवल्याचं या व्हिडीओत दिसून येतंय. निशाचा हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर तिचं कौतुक होतंय.

या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत निशा फक्त पाच वर्षांची असूनही जबाबदार वागत असल्याचं म्हंटलं आहे. काही युजर “निशा एक उत्तम मोठी बहिण ” असल्याचं म्हणाले आहेत. तर काहींनी सनी आणि डॅनिअलने मुलांना चांगले संस्कार केल्याचं म्हणत दोघांचं कौतुक केलं आहे. अनेक नेटकऱ्यांनी सनीची तिनही मुलं क्यूट असल्याचं म्हंटलं आहे.

सनी आणि डनिअलला तीन मुलं आहेत. निशाला त्यांनी लातूरमधून दत्तक घेतलं आहे. तर त्यानंतर सरोगसीच्या मदतीने तिला दोन जुळी मुलं आहेत. सनी आणि डॅनिअल मुलांच्या संगोपनाकडे कायम लक्ष देताना दिसतात. कामासोबतच मुलांना सांभाळण्यासाठी ते पुरेसा वेळ देतात. मुलांचा बर्थडे किंवा एखादा सण असला की ते मुलांसोबत सेलिब्रेशन करताना दिसतात.

वाचा: मेसेज बॉक्समध्ये नेटकऱ्यांचे विचित्र प्रश्न; “इतके छोटे कपडे का घातले?” विचारणाऱ्याला फातिमा म्हणाली..

दरम्यान, सनी लिओनी लवकरच शिरो या सिनेमात झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा टीझर रिलीज झाला होता. या सिनेमा हिंदीसह चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

20
READ IN APP
X