26 February 2021

News Flash

Katrina Kaif ki Hichki: ‘कतरिनाचं नृत्यकौशल्य शून्य’

मोठ्या अभिनेत्याच्या तोंडून हे ऐकल्यावर तिला धक्का बसला होता

राणी मुखर्जी सध्या तिच्या 'हिचकी' या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. या प्रमोशनमध्ये प्रत्येक सेलिब्रिटींना तिनं त्यांच्यातील काही दोष, कमतरताबद्ल विचारलं.

बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेली कतरिना कैफ हिचं नृत्यकौशल्य अनेकांना ठावूक आहे. ‘धूम ३’मध्ये आपल्या नृत्यकौशल्याने तिनं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर कतरिनानं अनेक आयटम नंबरही केले. पण यापूर्वी आपल्याला नृत्यकौशल्यावरून नावं ठेवली जायची याची कबुली तिनं दिली आहे.

वाचा : सुनील ग्रोवर, शिल्पा शिंदे कपिल शर्माविरुद्ध उभे ठाकणार?

राणी मुखर्जी सध्या तिच्या ‘हिचकी’ या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. या प्रमोशनमध्ये प्रत्येक सेलिब्रिटींना तिनं त्यांच्यातील काही दोष, कमतरतांबद्ल विचारलं. यावेळी कतरिनानं आपल्या सर्वात मोठ्या न्यूनगंडाची कबुली दिली. उत्तम नाचता येत नाही याचा न्यूनगंड आपल्याला होता हे कतरिनानं यावेळी कबुल केलं. याचा किस्साही तिनं सांगितला. एका तेलगू चित्रपटातील गाण्याचं चित्रिकरण कतरिना करत होती. तिच्यासोबत तेलगू सुपरस्टार व्यंकटेश होते. ‘वाँटेड चित्रपटाचं चित्रिकरण सुरू असताना व्यंकटेश यांनी माझं नृत्यकौशल्य शून्य आहे असं सलमान खानला सांगितलं होतं. मला ते ऐकून खूपच वाईट वाटलं होतं’ असं ती यावेळी म्हणाली. ही टिका जिव्हारी लागल्यानंतर आपण जवळपास सकाळी सात वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत  नृत्याचा सराव केल्याचंही तिनं मान्य केलं.

Video : १, २, ३…. आणि ‘मोहिनी’ परत आलीये..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2018 5:15 pm

Web Title: superstar venkatesh once said to salman khan as a dancer katrina kaif is zero
Next Stories
1 इरफान खानला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर
2 सुनील ग्रोवर, शिल्पा शिंदे कपिल शर्माविरुद्ध उभे ठाकणार?
3 Video: कतरिना- आमिरचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल
Just Now!
X