एकेकाळी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि सर्वाधिक चर्चेतली जोडी म्हणून अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांच्याकडे पाहिलं जायचं. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली होती. या दोघांवर प्रेक्षकांनीदेखील भरभरून प्रेम केलं. त्यामुळेच ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतील त्यांचे प्रत्येक सीन, त्याचं टायटल साँग आणि या दोघांवर चित्रित करण्यात आलेली गाणं विशेष गाजली. या मालिकेत या दोघांवर एक खास गाणं चित्रित करण्यात आलं होतं.मात्र, त्यावेळी ते प्रदर्शित करता आलं नाही. परंतु, सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर हे गाणं त्याच्या चाहत्यांसाठी प्रदर्शित करण्यात आलं असून सध्या ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सध्या सोशल मीडियावर ‘जैसी हो वैसी रहो’ हे गाणं तुफान लोकप्रिय ठरत आहे. हे गाणं ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत अंकिता-सुशांतवर चित्रित करण्यात आलं होतं. मात्र त्यावेळी ते प्रदर्शित करण्यात आलं नव्हतं. मात्र सुशांतच्या निधनानंतर त्याच्या चाहत्यांना सुशांतची एक आठवण म्हणून हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. हे गाणं सुशांत आणि अंकितावर चित्रित करण्यात आलं असून ते एक रोमॅण्टीक साँग आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेचं टायटल साँग आणि ‘साथियाँ ये तूने क्या किया’ हे गाणं तुफान लोकप्रिय झालं होतं. सुशांत आणि अंकिता या मालिकेमुळे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. मात्र काही वर्षांनंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मात्र ब्रेकअपनंतरही या दोघांमध्ये मैत्री कायम होती. सुशांतच्या मृत्युची बातमी समजताच अंकिताने त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती.