News Flash

सुशांतसह साराने केली होती बँकॉक ट्रीप?

सुशांतने खास सारासाठी अरेंज केलेली ट्रीप

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सध्या सीबीआय तपास सुरु आहे. यामध्येच एकीकडे अनेक गोष्टींचा खुलास होत आहे. तर दुसरीकडे सुशांतशी निगडीत अनेक गोष्टी समोर येत आहेत.मध्यंतरी सुशांतच्या युरोप ट्रिपची चर्चा रंगली होती. ही चर्चा संपत नाही तर यातच आता त्याच्या बँकॉक ट्रिपची चर्चा सुरु झाली आहे. यात सुशांतने खास चार्टड प्लेनची सोय केली होती.तसंच या ट्रिपमध्ये अभिनेत्री सारा अली खानदेखील होती, असं म्हटलं जात आहे.

अलिकडेच रिया चक्रवर्तीने सुशांतच्या बँकॉक ट्रीपविषयी वक्तव्य केलं होतं. यात सुशांत बँकॉकला मित्रांसोबत गेला होता असं म्हटलं होतं. परंतु, रिया खोट बोलत असून या ट्रीपमध्ये सारा अली खानदेखील होती, असं वक्तव्य सुशांतचा एक्स असिस्टंट साबिर अहमदने एका मुलाखतीत केलं आहे.

सुशांतने बँकॉक ट्रीपसाठी ७० लाख रुपये खर्च केले होते. तसंच त्याने खास चार्टड प्लेनचीदेखील सोय केली होती. या ट्रीपमध्ये कुशल जवेरी, सिद्धार्थ गुप्ता या मित्रांसह अभिनेत्री सारा अली खानदेखील होती. विशेष म्हणजे सुशांतने खास सारासाठी ही टूर अरेंज केली होती, असं साबिरने सांगितलं.
सुशांतचा एक मित्र साराला विमानतळावर घेण्यासाठी गेला होता. या ट्रीपमध्ये सारा आणि सुशांत एका पंचतारांकित आयलँड हॉटेलमध्ये थांबले होते. तसंच फक्त पहिल्याच दिवशी सुशांत आणि सारा सगळ्यांसोबत बीचवर गेले होते. त्यानंतर बाकी सगळ्या ट्रीमध्ये सुशांत आणि सारा हॉटेलमध्येच थांबले होते, असं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, सुशांत आणि सारा या दोघांनी ‘केदारनाथ’ या चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटानंतर या दोघांच्या अफेअरविषयी अनेक चर्चांना उधाण आलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2020 10:17 am

Web Title: sushant singh rajput booked a chartered plane during the bangkok trip only for sara ali khan ssj 93
टॅग : Sushant Singh Rajput
Next Stories
1 …म्हणून सोनू सूद पहिल्याच ऑडिशनमध्ये झाला शर्टलेस
2 ट्रोल करताना आई- बहिणीचा उद्धार का? ; ट्रोलर्सवर संतापला सुनील ग्रोवर
3 “खूप उडत होते, आता शांत झाले”; सुशांत प्रकरणावर कृष्णा अभिषेकने दिली प्रतिक्रिया
Just Now!
X