News Flash

सुशांतच्या अखेरच्या चित्रपटाच्या सेटवरील Video Viral; पाहा त्याचा अनोखा अंदाज

२४ जुलै रोजी ‘दिल बेचारा’ येणार भेटीस

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने अवघ्या ३४ व्या वर्षी आत्महत्या करुन आपलं जीवन संपवलं. सुशांतच्या आत्महत्येमुळे बॉलिवूडसह सर्वांनाच धक्का बसला. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचे जुने व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहेत. प्रत्येक व्हिडोत सुशांत हसत खेळत किंवा गात आणि नाचत असल्याचे दिसत आहे. सुशांतचा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे त्यामध्ये तो डान्सर सुब्बालक्ष्मी यांच्यासोबत डान्स करताना दिसत आहे.

हा व्हिडिओ सौभाग्य वेंकटेश यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्यामध्ये सुशांत आनंदी असल्याचं दिसत आहे. तो आपल्या खास अंदाजात डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सुशांतच्या अखेरचा चित्रपट दिल बेचारा या चित्रपटाच्या सेटवरील असल्याचे म्हटले जातेय. प्रसिद्ध डान्सर सुब्बोलक्ष्मी यांच्यासोबत सुशांत मजाक-मस्ती आणि डान्स करताना या व्हिडिओत दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

Ammamma with Sushant two of them full of positivity…

A post shared by Sowbhagya Venkitesh (@sowbhagyavenkitesh) on

सुशांतने इंजिनीअरिंगचं शिक्षण सोडून मुंबईत अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी आला होता. कोणताही गॉडफादर नसताना त्याने इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. बॅकग्राऊंड डान्सर, मालिका आणि चित्रपट असा त्याचा प्रवास अनेकांना हेवा वाटेल असा आहे. त्यामुळे त्याच्या आत्महत्येची घटना सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली. १४ जून रोजी सुशांतने मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

२४ जुलै रोजी ‘दिल बेचारा’ येणार भेटीस –

‘सुशांत सिंह राजपूत याचा दिल बेचारा हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. २४ जुलै रोजी हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित होणार असून सर्वांसाठी चित्रपट मोफत असणार आहे. मुकेश छाब्रा दिग्दर्शित ‘दिल बेचारा’ या चित्रपटात सुशांत मुख्य भूमिकेत आहे. तसेच अभिनेत्री संजना सांघी ही सुशांतसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. संजना या चित्रपटाच्या निमित्ताने कलाविश्वात पदार्पण करणार आहे. तसेच अभिनेता सैफ अली खानदेखील या चित्रपटात पाहूण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे जुलै २०१८मध्ये चित्रीकरण सुरु झाल्याच्या चर्चा सुरु होत्या. तसेच हा चित्रपट जॉन ग्रीक यांच्या ‘द फॉल्ट इन आवर स्टार्स’ या पुस्तकावर आधारित असल्याचे म्हटले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2020 11:37 am

Web Title: sushant singh rajput dancing with subbalakshmi on dil bechara sets nck 90
Next Stories
1 नवाजुद्दीन सिद्दीकीनं पत्नीच्या आरोपांवर सोडलं मौन; उचललं ‘हे’ पाऊल
2 ‘रसभरी’मधील अभिनेत्याने मुस्लिमांना धमकावल्याच्या आरोपावर स्वरा म्हणाली…
3 म्हणून चित्रपटात अभिषेक बच्चन इंटिमेट सीन देत नाही
Just Now!
X