बॉलीवूड अभिनेता सुशातं सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणामध्ये रोज नवीन माहिती समोर येत आहे. त्यातच मागील काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने घडामोडी घडत आहे त्यावरुन सुशांतच्या चाहत्यांना या प्रकरणामध्ये काहीतरी लपवलं जात असल्याची शंका येत आहेत. मुंबई पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर हे प्रकरण आता सीबीआयकडे सोपवण्यात आलं आहे. सुरुवातीच्या प्राथमिक चौकशीमध्ये पोलिसांनी हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे म्हटलं होतं. मात्र आता अशी काही माहिती समोर येत आहे ज्यामुळे या प्रकरणासंदर्भातील एकंरदितच चौकशी आणि आत्महत्येसंदर्भात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता एका फॉरेन्सिक एक्सपर्टने या प्रकरणामध्ये अनेक गोष्टी संक्षयास्पद असल्याचे म्हटलं आहे. या तज्ञाने उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे मुंबई पोलिसांच्या चौकशीबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केल जात आहे.

सुशांत सिंह राजपूतचे वडील के. के. सिंह यांनी एफआयआर दाखल केली आहे. यानंतर या प्रकरणाची चौकशी चौकशी सीबीआयकडे देण्यात आली आहे. त्यामुळेच याच पार्श्वभूमीवर टाइम्स नाऊने एक स्टींग ऑप्रेशन केलं. ज्यामध्ये काही धक्कादायक खुलासे तज्ज्ञांनी केल्याचे वृत्तवाहिनीने म्हटलं आहे. सुशांतच्या डायरीमधील काही पानं फाटलेली दिसून आली आहेत. तसेच सुशांतच्या रुममधील पंखाही वाकलेला नाही, असं निरिक्षण या तज्ज्ञांनी नोंदवलं आहे.  यामधून तज्ज्ञांना पंख्याला लटकून एखाद्याने आत्महत्या केल्यास त्याच्या वजनामुळे पंख्यावर ताण पडून तो थोड्या प्रमाणात खालच्या दिशेने झुकतो असं सूचित करायचं होतं.

याच स्टींग ऑप्रेशनसंदर्भातील वृत्तानुसार सुशांतच्या घरात सापडलेल्या डायरीमध्ये पहिल्या पानावर त्याचे नावं होतं. त्यानंतरची काही पान फाडण्यात आली होती. मात्र त्या डायरीमध्ये कोणती पानं फाडण्यात आली, ती कोणी फाडली आणि त्यावर काय मजकूर होता हे कळू शकलं नसल्याचं वृत्तवाहिनीचं म्हणणं आहे. तसेच फॉरेन्सिक एक्सपर्टने आमच्या फॉरेन्सिक टीमची पोलिसांनी कोणत्याही प्रकारे चौकशी केली नाही, आमच्याकडून कोणतीही माहिती घेतली नाही असंही असंही सांगितलं आहे. तसेच पोलिसांनी आमच्याकडून मृत व्यक्तीचे नेल सॅम्पल म्हणजेच नखांसंदर्भातील अहवाल आणि माहिती घेतली नाही असंही हा एक्सपर्ट म्हणाला आहे. याशिवाय सुशांतच्या रुमची कडी तुटलेली होती असंही या तज्ज्ञाने सांगितले आहे. या सर्व माहितीमुळे तपासासंदर्भात पुन्हा नव्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत.