बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाला दररोज वेगळं वळण मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रकरणाची सध्या सीबीआय तपास करत असून आतापर्यंत अनेकांची चौकशी करण्यात आली आहे. तसंच या चौकशीमध्ये अनेक नवीन खुलासेदेखील झाले आहेत. यातच आता सुशांतच्या मानसिक स्थितीविषयी त्याच्या बहिणीला प्रियांका सिंहला कल्पना होती अशी नवीन माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे तिचे आणि सुशांतचे काही मेसेज समोर आले असून यात तिने सुशांतला काही औषधे सुचवल्याचं सांगण्यात येत आहे.

१४ जून रोजी आत्महत्या करुन जीवन संपवणारा सुशांत ८ जूनपर्यंत त्यांच्या बहिणीच्या प्रियांका सिंहच्या संपर्कात होता. या दोघांचे मेसेज चॅट समोर आले असून ८ जून रोजी प्रियांकाने सुशांतला काही औषधांची नावं सुचवली होती. यात प्रियांकाने सुशांतला दिल्लीतील एका डॉक्टरांचं प्रिस्किप्शनदेखील दिल्याचं दिसून येत आहे.

आणखी वाचा- सुशांतला न्याय मिळणारच, कारण…; श्वेता सिंह किर्तीने व्यक्त केला विश्वास

“एक आठवडा Librium हे औषध घे. त्यानंतर दररोज नाश्त्यानंतर एकदा Nexito 10 mg हे घेत जा आणि जर कधी एजाइटी अटॅक आला तर Lonazep हे औषध घेत जा”, असे मेसेज प्रियांकाने सुशांतला केले होते. त्यावर,” सोनू दी पण कोणत्याही प्रिस्किप्शनशिवाय ही औषधं मिळणार नाहीत”, असा रिप्लाय सुशांतने दिला होता. त्यावर “मी पाहते काय करायचं, मी मॅनेज करते”, असं प्रियांका म्हणाली होती.

प्रियांकाने या काळात सुशांतला व्हॉइस कॉलदेखील केला होता. तसंच “मला फोन कर मला प्रिस्क्रिप्शन पाठवायचं आहे. माझे एक डॉक्टर मित्र आहेत जे तुझी मुंबईतील सगळ्यात चांगल्या डॉक्टरांसोबत ओळख करुन देतील. सगळं कॉन्फिडेंशिअल आहे. त्यामुळे काळजी करु नकोस,” असं तिने म्हटलं आहे.

आणखी वाचा- “रिया केवळ एक मोहरा, खरा मास्टर माईंड…; सुशांत प्रकरणावर कंगनाचा खळबळजनक दावा

दरम्यान, सुशांत आणि प्रियांकामधील हे चॅट मेसेज सध्या सर्वत्र चर्चिले जात आहे. तसंच सुशांतच्या आजारपणाविषयी त्याच्या घरातल्यांना कल्पना होती अशीही शक्यता वर्तविली जात आहे.