01 March 2021

News Flash

‘काइ पो चे’ची आठ वर्ष! सुशांतच्या आठवणीत दिग्दर्शक भावूक; म्हणाले…

अभिषेक कपूर म्हणतात...

छोट्या पडद्यावर ‘पवित्र रिश्ता’, तर रुपेरी पडद्यावर ‘काइ पो चे’ या चित्रपटांच्या माध्यमातून अभिनयाचं खणखणीत नाणं वाजवणारा अभिनेता म्हणजे सुशांत सिंह राजपूत. सुशांतचं निधन होऊन खरं तर बराच काळ लोटला आहे. मात्र, त्याच्या आठवणी आजही चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत. काइ पो चे या चित्रपटामुळे सुशांतला नवीन ओळख मिळाली. आणि तो तुफान लोकप्रिय झाला. सुशांतला प्रसिद्धीझोतात आणणाऱ्या या चित्रपटाला नुकतीच ८ वर्ष पूर्ण झाली आहेत.

‘काइ पो चे’ या चित्रपटाला ८ वर्ष झाल्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा चाहते आणि चित्रपटातील कलाकार सुशांतच्या आठवणींना उजाळा देत असल्याचं पाहायला मिळत आहे. यात दिग्दर्शक अभिषेक कपूर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुशांतसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

“आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या नव्या कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव खूप निराळा होता. या चित्रपटाने गेल्या काही वर्षात जे प्रेम मिळवलंय, त्याला कोणतीच सीमा नाही. तसंच लाडका अभिनेता सोडून गेल्याच्या दु:खालाही सीमा नाही”, अशी पोस्ट अभिषेक कपूर यांनी केली आहे.

दरम्यान, ‘काइ पो चे’ हा चित्रपट २०१३ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात सुशांत सिंह राजपूत मुख्य भूमिकेत झळकला होता. त्याच्यासोबत अमित साद, राजकुमार यादव हे कलाकारदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले होते. तीन मित्रांच्या भोवती फिरणारा हा चित्रपट तुफान लोकप्रिय ठरला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2021 8:45 am

Web Title: sushant singh rajput debut kai po che completes 8 years abhishek kapoor remembers actors ssj 93
Next Stories
1 शाहिद नव्हे तर ‘हा’ आहे मीरा राजपूतचा crush म्हणाली… l love him
2  ‘घेतला वसा टाकू नका’; चातुर्मासामधील कथा आता पडद्यावर
3 ‘स्त्री’ और’ रुही’को भेडिया का प्रणाम, वरुण धवनची जान्हवीला टक्कर
Just Now!
X