News Flash

सुशांतचा अंतिम शवविच्छेदन अहवाल

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत एकून २३ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी अंतिम शवविच्छेदन अहवाल पोलिसांना मिळाला आहे. गळफास घेतल्यामुळे श्वास कोंडून मृत्यू झाल्याचं या अहवालात स्पष्ट झालं आहे. रासायनिक चाचणीसाठी त्याच्या आतडयांचे नमुने सुरक्षित ठेवण्यात येतील व न्यायवैद्यक प्रयोगशाळेला पाठवण्यात येतील. सुशांतच्या मृतदेहावर कोणतीच जखम नसल्याचीही माहिती डॉक्टरांनी दिली. सुशांतने आत्महत्या केल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं आहे.

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत एकून २३ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये सुशांतचा चार्टर्ड अकाऊंटंट संजय श्रीधर याचाही समावेश आहे. सुशांतचे वडील, तीन बहिणी, त्याचा मित्र सिद्धार्थ पिठानी, मॅनेजर, स्वयंपाक आणि घरकाम करणारे, बिझनेस मॅनेजर, पीआर मॅनेजर, सुशांतच्या पहिल्या मालिकेते दिग्दर्शक, रिया चक्रवर्ती, मुकेश छाब्रा यांचेही जबाब नोंदवण्यात आले आहेत.

सुशांतच्या आत्महत्येवेळी त्याचा पाळीव कुत्रा दुसऱ्या खोलीत होता आणि तो जिवंत आहे अशीही माहिती पोलिसांनी दिली. सुशांतच्या आत्महत्येनंतर फज या त्याच्या कुत्र्याचेही निधन झाल्याची अफवा सोशल मीडियावर पसरत होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2020 7:32 pm

Web Title: sushant singh rajput suicide final postmortem report says no external injuries or foul play ssv 92
Next Stories
1 Video : सखी-सुव्रत लंडनमधून करतायत मालिकेचं शूटिंग; असा आहे अनुभव
2 स्वत:चा चित्रपट टीव्हीवर पाहताना अशी होती सुशांतची प्रतिक्रिया, व्हिडीओ व्हायरल
3 सलमानवर ट्विट करणं अभिनेत्याला पडलं महाग; येतायत पाकिस्तानमधून धमक्या
Just Now!
X