अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी मॅनेजर रेश्मा शेट्टी हिची चौकशी करण्यात आली. वांद्रे पोलिसांनी तब्बल पाच तास रेश्माची चौकशी केली. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ३५ लोकांचा जबाब नोंदवला आहे. १४ जून रोजी सुशांतने मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

रेश्माने सलमान खान, अक्षय कुमार, आलिया भट्ट यांसारख्या कलाकारांसोबत काम केलंय. ‘मॅट्रिक्स’ या बॉलिवूडमधल्या प्रतिष्ठित टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीच्या सर्वोच्च पदावर ती कार्यरत आहे. रेश्माने ‘बिग बॉस’ हा रिअॅलिटी शो आणि इतर मोठ्या चित्रपटांसाठी सलमानची मदत केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याआधी पोलिसांनी प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची चौकशी केली होती. या चौकशीदरम्यान भन्साळींनी सुशांतला चार चित्रपटांचे ऑफर दिले होते, हे समोर आलं. मात्र दुसऱ्या प्रॉडक्शन कंपनीसोबत असलेल्या करारामुळे सुशांतने ते चित्रपट नाकारले होते, असं भन्साळींनी सांगितलं. व्यावसायिक वैरामुळे सुशांत नैराश्यात होता का, याचा तपास पोलीस घेत आहेत.