02 March 2021

News Flash

पहिल्यांदाच जमणार आलिया-सुशांतची जोडी ?

'सडक' या चित्रपटामध्ये संजय दत्त आणि पुजा भट यांची केमिस्ट्री पाहायला मिळाली होती.

सुशांत सिंह राजपूत -आलिया भट

कधी काळी बॉलिवूडमध्ये सुपरहिट ठरलेला चित्रपट ‘सडक’ या चित्रपटाचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महेश भट दिग्दर्शित ‘सडक’ या चित्रपटामध्ये संजय दत्त आणि पुजा भट यांची केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. हा चित्रपट त्या काळी प्रचंड गाजला होता. त्यामुळेच या चित्रपटाचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये अभिनेत्री आलिया भट झळकणार असून आणखी एका नव्या अभिनेत्याचं नाव या चित्रपटासाठी चर्चिलं जात आहे.

‘सडक २’ या आगामी चित्रपटामध्ये आलियाबरोबर अभिनेता संजय दत्तही स्क्रिन शेअर करणार आहे. तसंच मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेमध्ये कोण झळकणार याविषयी अजून कोणतंही स्पष्टीकरण दिग्दर्शिक किंवा निर्मात्यांकडून देण्यात आलं नाही. मात्र सुशांत सिंह राजपूत याच्या नावाचा विचार सुरु असू नुकतीच त्याने दिग्दर्शक महेश भट यांची भेट घेतल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान, सुशांतने घेतलेल्या या भेटीमुळे ‘सडक २’ मध्ये सुशांत आलियाबरोबर झळकणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसंच काही दिवसापूर्वी सुशांतने या चित्रपटासंदर्भात ट्विटरवर एक पोस्टही केली होती. त्यामुळे सुशांतची या चित्रपटासाठी वर्णी लागणार का याकडे साऱ्यांच लक्ष वेधलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 10:31 am

Web Title: sushant singh rajput will be film sadak 2 sequel
Next Stories
1 मला बॉलिवूडमध्ये कोण कामच देत नाही, मिलिंद सोमणची खंत
2 राज्य शासनानेच आर. के. स्टुडिओ विकत घेऊन संग्रहालय उभारावे- माणिकराव ठाकरे
3 ‘ललित २०५’ मध्ये पाहायला मिळणार मंगळागौरीचा खेळ
Just Now!
X