News Flash

Video: ‘समांतर २’मध्ये वेगळं काय पाहायला मिळणार? स्वप्नील जोशी म्हणतो…

‘समांतर २’ ही वेब सीरिज १ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

ही १० भागांची सीरिज मराठीसह हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे.

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी. त्याची ‘समांतर’ ही वेब सीरिज प्रचंड गाजली होती. या वेब सीरिजचे खिळवून ठेवणारे कथानक आणि प्रत्येक रहस्य प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. या वेब सीरिजच्या पहिल्या सिझननंतर प्रेक्षक दुसऱ्या सिझनची आतुरतेने वाट पाहत होते. आता लवकरच या सीरिजचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्ताने अभिनेता स्वप्नील जोशीने लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावली. दरम्यान त्याने ‘समांतर २’ विषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

‘समांतर २’ ही वेब सीरिज १ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. सीरिजमध्ये स्वप्नील जोशी, तेजस्वीनी पंडीत, नीतीश भारद्वाज आणि सई ताम्हणकर दिसणार आहेत. ही १० भागांची सीरिज मराठीसह हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना ही सीरिज एमएक्स प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 7:39 pm

Web Title: swapnil joshi talk about samantar 2 web series avb 95
Next Stories
1 ‘धाकड’च्या शूटिंगसाठी बुडापेस्टला पोहोचला अर्जुन रामपाल; मुलगा आणि गर्लफ्रेंडसोबत करतोय मजा
2 ‘लक्ष्मी घर आयी’ मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
3 ‘ATMमधून पैसे काढले आणि बाहेर आलो तर…’, संचितने सांगितला धक्कादायक अनुभव
Just Now!
X