News Flash

“या देशात मुर्खांची कमी नाही..”, मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेतील गर्दी पाहून स्वरा भास्कर संतापली

स्वराचे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

देशात करोनाचा कहर सुरुच असून, दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. करोनामुळे लाखो लोकांचा जीव गेला आहे. दरम्यान, करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशातील विविध राज्यांत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. मात्र काही ठिकाणी त्याच पालन होतं नसल्याचं चित्र दिसत आहे. उत्तर प्रदेशातील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बदायूँ जिल्ह्यात मुस्लीम धर्मगुरुंच्या अंत्ययात्रेसाठी प्रचंड गर्दी करण्यात आल्याचं समोर आलं आहे. तो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने संताप व्यक्त केला आहे.

स्वराने एक ट्वीट रिट्वीट केलं आहे. मुस्लीम धर्मगुरू हजरत अब्दुल हमीद मोहम्मद सालिमुल कादरी यांचं रविवारी निधन झालं. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी जमलेल्या लोकांच्या गर्दीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लॉकडाउन असतानाही लोकांनी गर्दी केली आहे. हा व्हिडीओ रिट्वीट करत “या देशात मुर्ख लोकांची कमी नाही! निर्लज्ज अशिक्षित लोक!”, असे ट्विट करत स्वराने संताप व्यक्त केला आहे.

स्वरा भास्कर नेहमीच राजकीय भूमिका घेऊन तिची मतं मांडत असते. अनेकवेळा ती वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. स्वराने केलेले हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2021 3:14 pm

Web Title: swara bhaskar slams as thousand attend up clerics funeral in badaun uttar pradesh while breaking covid 19 norms flouted dcp 98
Next Stories
1 Video: नेहा कक्कर आणि रोहनमध्ये झाले भांडण? व्हिडीओ व्हायरल
2 अमित कुमार म्हणाले, “किशोर कुमार स्पेशल एपिसोड मला आवडला नाही…” ; एपिसोड थांबवा !
3 ‘आई-वडिलांची मदत घेऊ शकत नाही’, कमल हासन यांच्या मुलीवर कोसळलं आर्थिक संकट
Just Now!
X