27 January 2021

News Flash

स्वरा भास्करचे ब्रेकअप; पाच वर्षांपासून या व्यक्तीला करत होती डेट

'तनू वेड्स मनू' या चित्रपटाच्या सेटवर दोघांची मैत्री झाली होती.

स्वरा भास्कर

आपल्या परखड मतांमुळे सतत चर्चेत असलेली अभिनेत्री स्वरा भास्कर हिने २०१६ मध्ये पटकथालेखक हिमांशू शर्माला डेट करत असल्याचं जाहीर केलं होतं. आता या दोघांचं ब्रेकअप झाल्याचं कळतंय. गेल्या पाच वर्षांपासून स्वरा आणि हिमांशू रिलेशनशिपमध्ये होते. दिग्दर्शक आनंद एल रायच्या ‘तनू वेड्स मनू’ या चित्रपटासाठी एकत्र काम करत असताना हे दोघे डेट करू लागले. यात स्वरा सहाय्यक भूमिकेत होती. तर हिमांशूने या चित्रपटाची पटकथा लिहिली होती. यानंतर ‘रांझणा’ आणि ‘नीलबट्टे सन्नाटा’ या चित्रपटासाठी दोघांनीही एकत्र काम केलं होतं.

गेल्या वर्षी स्वराने हिमांशूसोबत युरोपमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. ‘जेव्हा तुमची गर्लफ्रेंड तुमच्यासोबत सुट्टी घालवण्यासाठी आणि सेल्फीकरिता पोझ देण्यास तुम्हाला भाग पाडते,’ असं तिने कॅप्शन लिहिलं होतं. आता स्वरा व हिमांशूने सामंजस्याने एकमेकांपासून दूर होण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. दोघांच्या कुटुंबीयांनाही या निर्णयाची माहिती आहे.

स्वराने ‘तनू वेड्स मनू’, ‘तनू वेड्स मनू २’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘नीलबट्टे सन्नाटा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ‘वीरे दी वेडींग’ या चित्रपटातील भूमिकेसाठी स्वराची फार चर्चा झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2019 4:22 pm

Web Title: swara bhasker and boyfriend himanshu sharma parted ways ssv 92
Next Stories
1 तापसी पन्नूला ‘सस्ती कॉपी’ म्हणणाऱ्या रंगोलीला अनुराग कश्यपने झापले
2 बॉयफ्रेंडच्या अचानक मृत्यूनंतर संजय दत्तच्या मुलीची भावनिक पोस्ट
3 BLOG: सुबोध भावे साकारणार आचार्य अत्रेंचा बायोपिक?
Just Now!
X