छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ गेल्या १२ वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सर्व कलाकार हे देखील कायम चर्चेत असतात. खासकरुन दयाबेन आणि जेठालाल यांच्यामधील संवाद प्रेक्षकांना प्रचंड आवडत असल्याचे पाहायला मिळते. तारक मेहतामधील सर्व कलाकारांनी सोनी वाहिनीवरील इंडियाज बेस्ट डान्सर या शोमध्ये हजेरी लावली. दरम्यान जेठालाल म्हणजे दिलीप जोशी यांनी शोमध्ये दया बनलेल्या स्पर्धकासोबत डान्स केला आहे.
सोनी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये जेठालाल शोमध्ये दयाबेन बनलेल्या रुतुजा जुन्नरकर या स्पर्धकासोबत डान्स करताना दिसत आहेत. दरम्यान रुतुजाने ‘टप्पू के पापा’ असे देखील म्हटले आहे. त्या दोघांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रुतुजा आणि दिलीप जोशी यांचा डान्स प्रेक्षकांना ‘इंडियाज बेस्ट डांसर’ (India’s Best Dancer)च्या आगामी भागामध्ये पाहायला मिळणार आहे. दरम्यान डॉक्टर हातीने देखील शोची परिक्षक बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरासोबत ‘अनारकली डिस्को चली’ या गाण्यावर डान्स केला आहे. मलायका आणि डॉक्टर हाथीचा देखील व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.