29 May 2020

News Flash

‘तान्हाजी’ची कमाई सुरूच; नवे चित्रपटही पडतायत फिके

नव्या चित्रपटांचं आव्हान असतानाही 'तान्हाजी'ने कमाईचा २७५ कोटींचा टप्पा पार केला आहे.

ओम राऊत दिग्दर्शित ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाने प्रदर्शनानंतर जोरदार कमाई केली. ही कमाई आता ४६ दिवसांनंतरही सुरूच आहे. ‘तान्हाजी’नंतर बरेच चित्रपट प्रदर्शित झाले. या नव्या चित्रपटांचं आव्हान असतानाही ‘तान्हाजी’ने कमाईचा २७५ कोटींचा टप्पा पार केला आहे. नरवीर तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. अजय देवगणने यामध्ये तान्हाजींची भूमिका साकारली आहे.

सातव्या आठवड्यात ‘तान्हाजी’ने शुक्रवारी ५२ लाख, शनिवारी ६३ लाख तर रविवारी ७४ लाख रुपयांची कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने २७६.९० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. प्रदर्शनानंतर पहिल्या तीन दिवसांत या चित्रपटाने ५० कोटी रुपये कमावले होते तर सहा दिवसांत १०० कोटींचा टप्पा पार केला होता. ही फक्त भारतातील कमाई आहे. परदेशातही या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.

‘तान्हाजी’ची कमाई- 

३ दिवसांत – ५० कोटी रुपये
६ दिवसांत – १०० कोटी रुपये
८ दिवसांत – १२५ कोटी रुपये
१० दिवसांत – १५० कोटी रुपये
११ दिवसांत – १७५ कोटी रुपये
१५ दिवसांत – २०० कोटी रुपये
१८ दिवसांत – २२५ कोटी रुपये
२४ दिवसांत – २५० कोटी रुपये
४२ दिवसांत – २७५ कोटी रुपये

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2020 5:19 pm

Web Title: tanhaji the unsung warrior ajay devgn movie box office collection is still on ssv 92
Next Stories
1 ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीवर बलात्काराचा प्रयत्न; आपबिती ऐकून तीन दिवस जेवली नाही आई
2 प्रियांकाच्या घरचा दरवाजा उघडला आणि समोर होता शाहिद…
3 अभिनेत्रीच्या उलट्या बोंबा; गर्दी असल्यामुळे ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ सोपवला मॅनेजरकडे
Just Now!
X