‘स्टुडन्ट ऑफ द इयर २’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे तारा सुतारिया. पहिल्याच चित्रपटामुळे लोकप्रिय ठरलेली तारा तिच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे जास्त चर्चेत येत असते. अलिकडे तिने अरमान जैन आणि अनिस्सा मल्होत्रा यांच्या लग्नाला हजेरी लावली होती. या लग्नामध्ये ताराची सर्वाधिक चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नाही तर या लग्नामध्ये तारा लवकरच आदर जैनसोबत लग्नगाठ बांधणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं.
गेल्या काही दिवसांपासून तारा आदर जैनला डेट करत असल्याचं सांगण्यात येत आहे. आदर हा राज कपूर यांचा नातू असून करीना आणि करिश्माचा आत्येभाऊ आहे. नुकतंच आदरच्या भावाचं अरमानचं लग्न झालं. या लग्नामध्ये तारादेखील आली होती. विशेष म्हणजे या लग्नात ताराने एक सुंदर गाणं सादर केलं. हे गाणं ऐकून आदरच्या आई खूश झाली आणि त्यांनी आनंदाने ताराला मिठी मारली. इतकंच नाही तर, “आता आदर आणि ताराचं लवकरच लग्न करायला पाहिजे” असं, त्या म्हणाला.
वाचा : माझ्यामुळे ‘डर’मध्ये शाहरुख खान दिसला -राहुल रॉय
आदरच्या आईने केलेल्या वक्तव्यामुळे त्यांनी या दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केला आहे. परंतु आदर किंवा ताराने याविषयी मौन बाळगणं पसंत केलं आहे. विशेष म्हणजे जर या दोघांचं लग्न झालं तर करीना आणि तारामध्ये नणंद-भावजयचं नवीन नातं निर्माण होईल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 5, 2020 12:02 pm